स्टेट बँक ऑफ इंडियातील सोन्याच्या तारण कर्जात तब्बल 85.81 लाखांची फसवणूक; दोन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

0
ChatGPT-Image-May-31-2026-01_45_06-PM.jpg


नांदेड (प्रतिनिधी)- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतील सोन्याच्या तारण कर्ज प्रकरणात तब्बल 85 लाख 81 हजार 597 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बँकेतील दोन अधिकाऱ्यांविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जून 2025 ते 11 मे 2026 या कालावधीत स्टेट बँक ऑफ इंडिया, डॉक्टर लेन शाखा, नांदेड येथे कार्यरत असलेले आदित्य प्रकाश सेनगावकर (वय 40), कॅश मॅनेजर आणि जीवन माधवराव जगदाळे (वय 39), सर्व्हिस मॅनेजर यांनी संगनमत करून पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बँकेत तारण ठेवण्यात आलेल्या एकूण 805.90 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांपैकी 391.60 ग्रॅम सोने काढून घेण्यात आले. त्याऐवजी 414.30 ग्रॅम बनावट सोने ठेवून बँक व ग्राहकांची फसवणूक करण्यात आली. या प्रकारामुळे बँकेचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी राजीव अनंत कदम (वय 40), मुख्य व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया, डॉक्टर लेन शाखा, नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 253/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 च्या कलम 316(5), 318(4) आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली असून, ग्राहकांच्या तारण मालमत्तेच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Post Views: 459






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed