रांगोळीमधून साकारला शनिशिंगणापूरचा नकाशा:सोनई कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांचा उपक्रम‎

0
app_17801368716a1abba7326fe_1009360703.jpg




महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय, सोनई येथील कृषिकन्यांनी एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले होते. “ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२६-२७” अंतर्गत या कृषिकन्यांनी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर गावाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यानंतर गावातील बानकर वस्ती येथे हुबेहूब रांगोळीच्या माध्यमातून गावाची संपूर्ण प्रतिकृती नकाशाच्या स्वरूपात साकारून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमासाठी कृषिकन्यांनी गावात प्रत्यक्ष फिरून सखोल निरीक्षण केले. चालताना निरीक्षण करणे, शेतकऱ्यांना प्रश्न विचारणे आणि स्थानिकांचे अनुभव ऐकणे या माध्यमातून त्यांनी शनिशिंगणापूरची भौगोलिक, सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी समजून घेतली. या पाहणी दरम्यान गावातील पिकांची सद्यस्थिती, उपलब्ध जलस्रोत, शेतीसमोरील मुख्य समस्या आणि विकासाच्या संधी यांसारख्या विविध मुद्द्यांचा अभ्यास करण्यात आला. कृषिकन्यांनी तयार केलेल्या या रांगोळीच्या नकाशात आणि सादरीकरणात गावाचा वार्षिक पीक तक्ता, उत्पादन तक्ता, मातीचा प्रकार दाखवणारा तक्ता, सामाजिक नकाशा, रस्त्यांचे जाळे, रहदारीचा नकाशा, गावातील जलकुंभ आणि विविध सरकारी कार्यालयांची अचूक ठिकाणे दर्शवण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed