AI वापर काळाची गरज:प्रत्येक जवानाला ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण आवश्यक – जनरल उपेंद्र दिवेदी
![]()
आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर ही बदलत्या काळाची गरज आहे. जगात युद्धाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असून उपलब्ध साधनसामुग्रीचा चांगल्या प्रकारे वापर करण्यास उपयोग होतो. तसेच अल्पावधीत निर्णय घेणे देखील सुलभ झाले आहे.प्रत्येक जवानाला ड्रोन उडवण्याची क्षमता विकसित करता आली पाहिजे. लढाईच्या मैदानात आता ड्रोन संख्या अधिक असणार आहे त्यामुळे त्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे. परिणामी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर लष्करात वाढवण्यावर भर दिला जात आहे असे मत चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल उपेंद्र दिवेदी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. जनरल उपेंद्र दिवेदी म्हणाले, एनडीए मध्ये पॅसिंग ऑफ परेड मध्ये आज एकूण ३५३ कॅडेट यांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून यात १८ महिला कॅडेट यांचा समावेश आहे. तरुण कॅडेट हे देशसेवा करण्यासाठी सज्ज झाले आहे. चार्ली स्कॅडेन मध्ये जाऊन मला माझ्याकाळातील ऊर्जा पुन्हा मिळाली आहे. ऑपरेशन सिन्दुर हे यापुढे देखील सुरूच राहणार आहे. तिन्ही दलाचा समन्वय ठेवून पुढील युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्याचे दृष्टीने सक्षमता निर्माण केली जात आहे. विजय हा नेहमी लक्षात राहतो पण माहितीवर आधारित युद्ध परिस्थितीत विविध यंत्रणात समन्वय , विश्वास असणे महत्वाचे आहे.थिएटर कमांड पुढील दोन ते तीन वर्षात प्रत्यक्षात आपल्याला पहावयास मिळेल. पंतप्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली मेक इन इंडिया अंतर्गत आत्मनिर्भर भारत संकल्पनांवर भर देण्यात येत आहे. संरक्षण उत्पादन देशात निर्माण केल्याने उद्योगांना देखील चालना मिळत आहे.
