अखिल भारतीय सफाई मजदूर संघातर्फे आरक्षण उप-वर्गीकरणाबाबत जनजागृती:नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचेही वाटप, एकजूट दाखवण्याची वेळ‎

0
240_17800534396a1975bf0f453_kishordhamane.jpg



अखिल भारतीय सफाई मजदूर संघाच्यावतीने रुक्मिणी नगर येथील सुयोग मंगल कार्यालयात अनुसूचित जातीच्या उप-वर्गीकरणासंदर्भात जनजागृती मोहिमेचे व मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संपूर्ण अमरावती जिल्ह्यातून सफाई कामगार बांधव आणि महिला भगिनी उ

.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे स्वागत, दीपप्रज्वलन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व वासुदेव चांगरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अत्यंत उत्साहात झाली. सरकारने संघटनेला सोबत घेऊन सामाजिक जनगणना करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टांक यांनी केली.

या जनजागृती मोहिमेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील संघटनेचे अधिकारी, कार्यकर्ते, संस्थेचे प्रमुख पदाधिकारी आणि समाजसेवकांची एक संयुक्त बैठक पार पडली. यावेळी जिल्हा शाखा आणि इतर शाखेतील पदाधिकाऱ्यांची अधिकृत निवड करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली.

“आम्हाला आरक्षण हवे’ अशा घोषणांनी संपूर्ण सुयोग मंगल कार्यालय आणि परिसर दुमदुमून गेला होता. या सभेला राष्ट्रीय सरचिटणीस जयसिंग कछवाह, राज्याचे अध्यक्ष श्रबाली मांडेपू, सरचिटणीस महतो, राहुल टांक, व गणेश तंबोले,सचिव जावडेकर व राठी, खजिनदार अशोक सारवण, जिल्हाध्यक्ष किशोर धामणे, उपाध्यक्ष राजा डेंडुले आणि सरचिटणीस राकेश पांडे यांच्यासह अखिल भारतीय सफाई मजूर संघाचे सर्व पदाधिकारी, समाजसेवक व कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सचिव संजय मिलांदे यांनी केले, तर आभार जिल्हाध्यक्ष किशोर धामणे यांनी मानले. ऑल इंडिया सफाई मजूर युनियन अमरावतीतर्फे आयोजित हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धतेने आणि वेळेत पार पडला. ते म्हणाले की, आरक्षणाचे उप-वर्गीकरण झालेच पाहिजे. समाजाच्या सर्वांगीण सामाजिक प्रगतीसाठी आणि उच्चपदस्थ अधिकारी वर्ग घडवण्यासाठी समाजातील अत्यंत मागासलेल्या व दुर्बळ घटकांना आरक्षणाचा लाभ मिळणे गरजेचे आहे. यासाठी संपूर्ण समाजाने आता एकत्र येऊन एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed