शिवसेनेच्या बूथ स्तरावर हालचालींना वेग:डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात आढावा बैठक

0
d8f91581-1c0f-474d-abae-6b9a7e4a404c_1779960857130.jpg




आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने बूथ स्तरावर संघटना मजबूत करण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे. याच अनुषंगाने शिवसेना नेत्या तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात बूथ पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक अडचणी, स्थानिक प्रश्न आणि बूथ स्तरावरील समन्वयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे, किरण साळी, आनंद गोयल, प्रकाश ढमढेरे, सुधीर कुरुमकर, मिलिंद अहिरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, निवडणूक आयोगाकडून मतदार यादी पडताळणी मोहीम सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष गहन पुनरावृत्ती संदर्भात केलेल्या आवाहनानुसार पक्ष पदाधिकाऱ्यांनी अधिक सक्रिय होणे गरजेचे आहे. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा राज्यभर दौरा सुरू असून बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना सक्षम करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी पक्षाने नियुक्त केलेल्या बूथ पदाधिकाऱ्यांना अधिकृत ओळखपत्र देण्याबरोबरच मोबाईल ॲप्लिकेशनचे प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. स्थानिक प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी विभागनिहाय बैठका घेण्यावरही डॉ. गोऱ्हे यांनी विशेष भर दिला. शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी ‘बूथ स्तरावर मजबूत संघटन उभारल्याशिवाय पक्ष प्रभावी होणार नाही. प्रत्येक पदाधिकाऱ्याने जनतेशी सातत्याने संपर्क ठेवला पाहिजे,’ असे मत व्यक्त केले. महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी संघटनात्मक कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे आवाहन केले. पारंपरिक प्रचार सोबत आधुनिक तंत्रज्ञान मदत घेऊन कार्यकर्त्यांनी काम करावे. याबाबतचे प्रशिक्षण देखील कार्यकर्त्यांनी घेतले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed