बारड येथे गळ्यातील मंगळसूत्र चोरी

0
images-6.jpg


नांदेड (प्रतिनिधी)- मुदखेड तालुक्यातील बारड येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास बारड येथे फिर्यादी अनिता शामराव कानवटे (वय ४५, रा. सैनिक कॉलनी, नांदेड) यांच्या गळ्यातील अंदाजे ४९ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेले. या प्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार भाडेकर हे करीत आहेत.






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed