BSNL Recharge | BSNL ग्राहकांसाठी गुड न्यूज! कंपनीने केली मोठी घोषणा
BSNL Recharge | BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन डिजिटल सुविधा सुरू केली आहे. ‘BSNL Pay’ नावाचं हे फीचर आता ग्राहकांना थेट Selfcare अॅपमधूनच रिचार्ज आणि बिल पेमेंट करण्याची सुविधा देणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पेमेंट अॅप्सवर जाण्याची गरज संपणार असून ग्राहकांना अधिक जलद आणि सुरक्षित अनुभव मिळणार आहे.
सध्या ऑनलाइन रिचार्ज करताना अनेक ग्राहकांना PhonePe, Google Pay किंवा इतर बँकिंग अॅप्सवर स्विच करावं लागतं. या प्रक्रियेमुळे वेळ जातो आणि काहीवेळा व्यवहार अडकण्याचाही त्रास होतो. मात्र BSNLने आपल्या नव्या ‘BSNL Pay’ सुविधेद्वारे हा अनुभव अधिक सुलभ केला आहे. आता ग्राहकांना थेट BSNL Selfcare अॅपमध्येच रिचार्ज आणि बिल पेमेंट करता येणार आहे.
कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या नव्या फीचरची घोषणा केली. कंपनीच्या माहितीनुसार, ग्राहकांना अखंड आणि सुरक्षित डिजिटल पेमेंट सुविधा देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे, सध्या Bharti Airtel, Reliance Jio आणि Vodafone Idea यांच्याकडे अशा प्रकारचं इन-अॅप पेमेंट इंटीग्रेशन उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात आहे.
BSNL Recharge | UPI Lite आणि AutoPay सारखी आधुनिक फीचर्स :
या सुविधेसाठी BSNLने National Payments Corporation of India च्या UPI प्रणालीचा वापर केला असून BHIMसोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे व्यवहार अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहेत. या प्लॅटफॉर्ममध्ये AutoPay, UPI Lite, Frequent Recharge आणि फास्ट बिल पेमेंट यांसारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत.
AutoPay सुविधेमुळे ग्राहकांचे मासिक रिचार्ज किंवा बिल पेमेंट ठरलेल्या तारखेला आपोआप पूर्ण होणार आहे. तर UPI Liteमुळे कमी रकमांचे व्यवहार PIN शिवाय झटपट करता येतील. बँक सर्व्हरमध्ये अडचण आली तरी व्यवहार सुरळीत होण्याची शक्यता वाढणार आहे. Frequent Recharge फीचरमुळे वारंवार इंटरनेट आणि कॉलिंग वापरणाऱ्या ग्राहकांना अखंड सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
सध्या ही सुविधा BSNL Selfcare अॅपमध्ये टप्प्याटप्प्याने उपलब्ध केली जात असून भविष्यात अधिकाधिक ग्राहकांपर्यंत ती पोहोचवली जाणार आहे. या निर्णयामुळे टेलिकॉम क्षेत्रातील डिजिटल स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
