कोठडीतील आरोपीला घरचे जेवण देणे पडले महागात:कळमनुरीतील पोलीस जमादार निलंबित, एस.पी. डॉ. नीलाभ रोहन यांचे आदेश

0
whatsapp-image-2026-05-25-at-84452-pm_1779723114.jpeg




कळमनुरी पोलीस ठाणे अंतर्गत खूनाच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला घरचे जेवण देणे पोलीस जमादाराला चांगलेच महागात पडले असून संबंधित जमादाराला सोमवारी ता २५ निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी काढले आहेत. कळमनुरी पोलीस ठाणे अंतर्गत कळमनुरी शहरांमध्ये दिनांक 23 मे रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.या प्रकारात तातडीने आरोपींची शोध मोहीम हाती घेऊन सहापैकी चार आरोपींना अटक करण्यात आली. सदर चार आरोपी पोलीस स्टेशन कळमनुरी मध्ये कोठडीत कुलूप बंद आहेत, कोठडीतील आरोपीतांना नियमानुसार जेवण व इतर सुविधा दिल्या जातात. परंतु पोलीस जमादार जगन पवार यांनी कोठडीतील आरोपींना घरचे जेवण व फॅन ही सुविधा बेकायदेशीर रित्या पुरविली व साध्या वेश्यामध्ये आरोपीशी संपर्क साधला. याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे यांनी सीसीटीव्ही फुटेज ची पडताळणी करून कसुरी अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला होता. या अहवालावरून पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी पोलीस जमादार जगन माणिक पवार यांना तात्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित केले आहे. सर्व पोलीस अंमलदार यांना सूचना दिली आहे की कोठडीतील आरोपी त्यांना नियमानुसार वागणूक द्यावी बेकायदेशीर रित्या खाजगी जेवण पाणी व इतर सुख सुविधा पुरविण्यात येऊ नये व अनावश्यक संपर्क टाळावा. तसेच तपासीक अंमलदार किंवा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्या परवानगीशिवाय कोठडीतील आरोपींना बेकायदेशीर रित्या इतर लोकांसोबत संपर्क होऊ देऊ नये असे स्पष्ट आदेश पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed