काही दिवसांपूर्वी केलेल्या काही आयपीएस  बदल्यांमध्ये बदल करून नवीन जागा दिल्या;काहींना नवीन नियुक्त्या 

0
18_09_2025-23_04_2025-ips_transfer_in_up_23924158_m.webp.webp


मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने गुरुवारी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक, आयपीएस तसेच राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापना करण्यात आल्या आहेत.

विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जातील बदल्यांमध्ये प्रविण पडवळ यांची व्हीआयपी सुरक्षा विभाग, दादर येथे नियुक्ती करण्यात आली असून संजय येनपुरे यांची नाशिक परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे. तसेच संदीप पाटील यांची नागपूर परिक्षेत्रात नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस उपमहानिरीक्षक स्तरावर प्रमोद शेवाळे यांची नवी मुंबई येथे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी राठोड यांची ठाणे शहरात अपर पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे.

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये विनय राठोड यांची ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. धीरज कुमार बच्चू यांना ठाणे शहरात पोलीस उपआयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांचे पूर्वीचे बदली आदेश रद्दही करण्यात आले आहेत.

राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांमध्ये संभाजी कदम यांची पुणे दहशतवाद विरोधी पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक पानसरे यांची ठाणे शहरात पोलीस उपआयुक्त म्हणून बदली झाली असून अमरसिंह जाधव यांना डायल-११२, नवी मुंबई येथे पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, पोलीस महासंचालकांनी न्यायालयीन आदेश, निवडणूक आचारसंहिता तसेच कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

वाचकांच्या सोयी साठी बदलाच्या चार संचिका जोडल्या आहेत. 

202605211913053229

ORDER DIG TRANSFER 21.05.2026 signed

Transfer Order 21.05.2026 – SP IPS signed

Transfer Order 21.05.2026 SPS signed


Post Views: 270






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed