एपिस्टन फाईलमध्ये नाव आल्याने पंतप्रधानांच्या भूमिका बदलल्या:ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप; इंधन दरवाढीला मोदी जबाबदार

0
9765d6f6-b6ba-4784-abf6-d88fee53b9d7_1779430639534.jpg




एपिस्टन फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आल्यानंतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताच्या भूमिका सातत्याने बदलत आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. देशातील इंधन आणि गॅस टंचाई तसेच दरवाढीसाठी पंतप्रधान मोदीच एकमेव जबाबदार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आंबेडकर म्हणाले की, भारतात गॅस आणि इंधनाची टंचाई आहे. युद्ध संपल्यानंतर क्रूड ऑइल भारतात येणे आवश्यक होते, परंतु तसे झाले नाही. यामुळे इंधन आणि गॅसचे दर गगनाला भिडणार असून, त्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. भारताची भूमिका पॅलेस्टाईनसोबत असावी, परंतु सरकार इस्रायलसोबत उभे आहे. यापूर्वी आपण पॅलेस्टाईनसोबत होतो, पण अचानक आपले धोरण बदलून इस्रायलसोबत का गेलो, याचा जाब जनतेने भाजपला विचारला पाहिजे, असे आंबेडकर यांनी नमूद केले. इस्रायलला भारत स्टील का पुरवत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान इटलीमध्ये गेले, कारण त्यांचा दुसरा हेतू होता. पॅलेस्टाईनमध्ये इस्रायलमुळे हल्ले सुरू आहेत. भारत इस्रायलला लक्ष्मी इंडस्ट्रीज, छत्रपती संभाजीनगर, जालना येथून पाठवण्यात आलेले 400 टन स्टील इटलीत पकडले गेले आहे. ही आंतरराष्ट्रीय दृष्टीने अत्यंत घातक बाब आहे. पकडण्यात आलेल्या वस्तू सोडवण्यासाठी पंतप्रधानांनी इटलीला विनंती केली. भारताला क्रूड ऑइल पुरवठा करण्यास अनेक देश तयार आहेत, परंतु पंतप्रधानांची भूमिका इस्रायलसाठी झुकलेली आहे. देशाच्या हिताचे धोरण मोदी यांनी का बदलले, याचे उत्तर जनतेने पंतप्रधानांना विचारले पाहिजे, असे आंबेडकर यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाहनांचा अतिरिक्त वापर टाळा असे सांगतात आणि त्यांचे नेते अनेक उपाययोजना करताना दाखवतात, परंतु ते स्वतः आणखी गाड्यांचा ताफा घेऊन फिरत आहेत. पंतप्रधान सोन्याची खरेदी करू नका असे जनतेला सांगत आहेत, म्हणजे महिलांना देखील ते अप्रत्यक्षपणे मंगळसूत्र वापरू नका असे सांगत आहेत, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed