नीट परिक्षेची उत्तर पत्रिका खरेदी करणाऱ्या पालकांना लाज वाटायला हवी
नांदेड(प्रतिनिधी)-पालकांनो आपल्या पाल्यांसाठी 10 लाख रुपये खर्च करून तुम्ही जर पात्रता परिक्षेची उत्तर पत्रिका खरेदी करून त्याला उत्तीर्ण करून घेणार असाल तर त्याच्या भविष्याचा कधी विचार केला काय शिकेल ? आणि काय सेवा देईल? सोबतच उत्तरपत्रिका खरेदी करणाऱ्या पालकांनी खऱ्या अर्थाने मेहनत घेवून परिक्षा दिलेल्या सक्षम उमेदवारांवर केलेला हा अन्याय त्यांच्या मुलांना कसा उज्वल भविष्याकडे नेईल. आता या निट पेपरफुटी प्रकरणात सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. अजूनही किती जण अटक होणार आहेत हे भविष्यात दिसेल. पण या चाललेल्या चुकीच्या प्रकारावर सर्वंकष पध्दतीने विचार होण्याची गरज आहे.
नीट परिक्षा-2026 ही 3 मे रोजी संपन्न झाली. 7 मे रोजी राष्ट्रीय गुणवत्ता प्राधिकरण(एनटीए) ला गैरप्रकाराची माहिती प्राप्त झाली. 12 मे रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. तपास केंद्रीय अन्वेशन विभाग(सीबीआय)कडे गेला. केंद्र सरकारने परिक्षाच रद्द केली. 13 मे रोजीच 5 आरोपींना अटक झाली. देशभरात 14 ठिकाणी छापे मारण्यात आले. मोबाईल, लॅपटॉप, अनेक दस्तऐवज जप्त करण्यात आले.या प्रकरणामध्ये आतापर्यंत अटक झालेल्या लोकांची नावे आणि त्यांचा या गुन्ह्यातील सहभाग पुढील प्रमाणे नमुद आहे. शुभम खैरनार-नाशिक(महाराष्ट्र), मांगीलाल बिवाल,-जयपूर(राजस्थान), दिनेश बिवाल-स्थानिक दलाल (जयपूर), मनिषा वाघमारे-मध्यस्थ (पुणे), लोकहांडे-नेटवर्क सदस्य, प्रा.पी.व्ही. कुलकर्णी-पुणे येथील रसायन शास्त्राचे प्राध्यापक (मुख्य सुत्रधार), एक बीटेक पदवीधर-मास्टमाईंड गटाशी संबंधीत, दोन एमबीबीएस विद्यार्थी-उत्तरपत्रिका सोडविण्याचे काम केले. हा घोटाळा राबवतांना पेपर अगोदरच बाहेर काढून कोचिंग, दलाल, विद्यार्थी नेटवर्क तयार करण्यात आले आणि लाखो रुपयांच्या मोबदल्यात उत्तर पत्रिका देण्यात आल्या.
नव्याने प्राप्त झालेल्या माहितीनुसार लातूर येथील आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.शिवराज मोटेगावकर, यांनाही अटक झाली आहे. पण प्रशासकीय स्तरावर अद्याप दुजोरा मिळालेला नाही. लातूर, नांदेड, पुणे, नाशिक,अकोला, कोल्हापूर एवढ्या ठिकाणी आरसीसी कोचिंग क्लासेस कार्यरत आहे. परिक्षेचा पेपर लिक होणे हा काही भारतातील पहिला प्रकार नाही. असे घडल्यावर एक दुसऱ्यावर आरोप करण्याशिवाय राजकीय नेते काहीच करत नाहीत. प्रश्न त्या संबंधीत परिक्षा प्रक्रियेचा आहे. या प्रक्रियेत घेतल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या इमानदारीची परिक्षा होण आवश्यक आहे. तरच कोठे तरी या प्रकरणाला पुर्णविराम मिळू शकेल. नसता तपास तर सुरूच आहे. त्यात-काय-काय होईल हे भविष्यात दिसेलच.
सर्वात मोठा प्रश्न पालकांचा आहे की, जे पालक 10 लाख रुपये देवून नीट या परिक्षेची उत्तर पत्रिका मिळवतात. त्यांची मुले पुढे अभियंता किंवा वैद्यकीय शिक्षण घेतांना काय शिकतील आणि त्यानंतर त्यानंतर काय सेवा देतील. याचा अर्थ त्यांना सुरुवातीपासूनच चुकीचे काम करण्याची प्रवृत्ती दिली जात आहे. ही प्रवृृत्ती देण्याची जबाबदारी पालकांची आहे काय? थोडी तर लाज यात वाटायला हवी होती. जर तुमच्या पाल्याची पात्रताच नसेल तर त्याला शिक्षण देवून करणार तरी काय?या सोबतच ज्या गुणवंत मुला-मुलींनी खूप मेहनत घेवून परिक्षा दिली त्यांची तर वाट लागली. आता त्यांना पुन्हा परिक्षा द्यावी लागणार आहे. दुसऱ्यांदा परिक्षा देण्याची वेळ आल्यासमुळे गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थींवर मानसिक दडपण आले. याचा जबाबदार कोण ? खऱ्या अर्थाने निट परिक्षा किंवा कोणतीही परिक्षा ज्या पध्दतीने व्यवस्थापित केली जाते. त्या प्रक्रिया पध्दतीमध्ये समुळ बदल होण्याची नक्कीच गरज आहे.
नांदेडमध्ये आरसीसी कोचिंग क्लासेसच्या शाखा बंद करण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुध्दा देण्यात आला. का त्यांना पोलीस बंदोबस्त देण्याची गरज आहे. त्यांनी चुकीचे काम केले असेल तर प्रश्न विचारणाऱ्यांचा तो आपला अधिकार आहे. देवू द्या ना उत्तर आरसीसी क्लासेसला. प्रशासनाला त्यात हस्तक्षेप करण्याची गरज काय? प्रश्न विचारणाऱ्यांनी काही बेकायदेशीर कृत्य केलेच तर त्यांच्यासाठी सुध्दा कायदा आहेच. मग प्रश्न विचारणाऱ्यांना का रोखले जात आहे.
Post Views: 341
