ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई; १ कोटी २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

0
c7f0e2ee-2878-4ecd-80fd-e2e2bb63d0df.jpg


नांदेड : जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या “ऑपरेशन क्रॅकडाऊन” मोहिमेंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत गोदावरी नदीपात्रातून अवैध रेती उपसा करणाऱ्या इसमांवर छापा टाकला. या कारवाईत तब्बल १ कोटी २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, इजंगाव व बोंडार शिवारातील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या रेतीचा उपसा करून साठा केला जात आहे.

या माहितीच्या आधारे १७ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान रेती उपसा व वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री आणि वाहने जप्त करण्यात आली.

या प्रकरणी माधव मोतीराम जाधव (रा. हिंगोली ता. लोहा), इंद्रजीत सिंह केसर सिंह सोधी (रा. नांदेड), शेख अजनी शेख सलीम (रा. खुडे नगर, नांदेड), पिंटू पाटील तिडके (रा. बोंडार, ता. जि. नांदेड) तसेच चार अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी एका बोटींसह आयशर वाहन, एसीई कंपनीची क्रेन, २० ब्रास रेती, सहा इंजिन आणि इतर साहित्य असा एकूण १,००,२५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई  उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत——– यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास नांदेड ग्रामीण पोलीस करीत आहेत.


Post Views: 3






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed