लग्नासाठी नकार दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी:परभणी जिल्ह्यातील तरुणावर हट्टा पोलिस ठाण्यात पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल

0
new-project-2026-05-17t122537104_1779001075.jpg




हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात अल्पवयीन मुलीस लग्नासाठी नकार दिल्यास छायाचित्र व्हायरल करून तिचे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी देणाऱ्या तट्टूजवळा (जि. परभणी) येथील एका तरुणावर शनिवारी ता. 16 सायंकाळी हट्टा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील मुलगी परभणी येथे शिक्षणासाठी राहात होती. यावेळी तट्टूजवळा येथील विक्रम कदम हा तरुण तिचा सतत पाठलाग करीत होता. मात्र त्या मुलीने त्याकडे दुर्लक्ष केले. सन 2021 पासून ते पाठलाग करीत असतांनाही त्याच्या त्रासाकडे तिने दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतही विक्रम तिचा पाठलाग करीत होता. यावेळी त्याने तिचा हातधरून विनायभंग केला. या प्रकारामुळे मुलगी घाबरून गेली. सदर प्रकार घरी सांगितल्यास आपले शिक्षण बंद होईल याची भिती त्या मुलीला होती. त्यामुळे तिने हा प्रकार सहन केला. दरम्यान, सदर मुलगी नांदेड येथे गेली असतांना त्या ठिकाणीही तिचा पाठलाग करून एका ठिकाणी तिचे छायाचित्र काढले. त्यानंतर त्याने मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधून तुमच्या मुलीचे माझ्यासोबत लग्न लाऊन द्या अन्यथा मुलीचे छायाचित्र व्हायरल करून तिचे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली. तसेच मोबाईलवर मेसेज पाठविला. या प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तिला विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी मुलीस सोबत घेऊन हट्टा पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून हट्टा पोलिसांनी विक्रम कदम याच्या विरुध्द पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक युवराज गवळी पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed