वडिलांचा दगडाने ठेचून खून; मुलाला काही तासांत अटक

0
newspaper-murder-icon-DN1TCK.jpg


कंधार (प्रतिनिधी)-  तालुक्यातील हाटवाळ येथे कौटुंबिक वादातून मुलानेच वडिलांचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कंधार पोलिसांनी आरोपी मुलाला काही तासांत अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास हट्क्याळ  येथे ही घटना घडली. सुरेश बाबुराव मोरे (वय ४७) यांचा त्यांचा मुलगा सुदर्शन सुरेश मोरे (वय २७) याने मनात राग धरून डोक्यात दगड मारून खून केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चौत्राबाई बाबुराव मोरे (वय ६०) यांनी कंधार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपीला काही तासांतच ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि कोकाटे करीत आहेत.


Post Views: 144






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed