[ads1]
![]()
गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणामधून एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या मंत्र्यांची शिष्टाई अखेर कामाला आली असून, 4 सप्टेंबरपासून कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन मराठा समाजाला करण्यात आले आहे. त्यासाठी नातं, रक्ताचं नातं आणि कुळ या मुद्द्यांच्या आधारे ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना हा अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येत्या 5 सप्टेंबरपर्यंत ग्रामपंचायतींमध्ये या नोंदींची यादी लावण्यात येणार आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत नागरिकांना काही अडचणी आल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. मंत्र्यांच्या शिष्टमंडळाची भेट मराठा समाज्याच्या ज्या 58 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्यांना व्हॅलिडिटी देण्यासोबत इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे हे गेल्या सहा दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आंदोलनासाठी बसले आहेत. त्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या गटाने विचार केला आणि ते मनोज जरांगेंच्या भेटीला आले. या मंत्र्यांच्या शिष्टमंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि मकरंद पाटील यांचा समावेश आहे. समाजाने कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावे- मनोज जरांगे हैदराबाद गॅझेटनुसार ज्या 58 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्यांना व्हॅलिडिटीसाठी अर्ज करण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. तसेच हैदराबाद गॅझेटनुसार 4 सप्टेंबरपासून मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. तसेच सातारा आणि कोल्हापूर गॅझेटचाही जीआर सरकारने काढावा अशी मागणी जरांगे यांनी मंत्र्यांकडे केली. कुळानुसार अर्ज करा पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, उद्यापासून मराठवाड्यातील मुलांनी अर्ज करावेत. रक्तातले नाते, सेम आडनाव असेल तर अर्ज करा. नसेल तर तुमचं कुळ एक आहे का ते पहा. कुळानुसार अर्ज करा. तुम्ही नाते संबंधातील आहेत का पहा आणि उद्यापासून अर्ज करा. त्यानंतर आपण सरकारला व्हॅलिडीटी आणि प्रमाणपत्र मागू. नाही निघाल्यानंतर त्यांना SOP मध्ये बदल करायला सांगू. दोन दिवसात काय परिस्थिती आहे ती समोर येईल. अर्ज स्वीकारले नाही तर.. तसेच तुमचे अर्ज स्वीकारले नाही तर तुम्ही पुन्हा इथे या. मी यांना फोन करून सांगतो की अर्ज नाही घेतले. यावर बोलताना विखे पाटलांनी म्हटले की, गॅझेटनुसार तुम्ही अर्ज केले आणि अर्ज नाही घेतले तर जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करा. यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्यानंतर कलेक्टर संबंधित अधिकाऱ्यांना सांगून कार्यवाही करतील. यामुळे तुम्हाला धावपळ करण्याची गरज नाही.
[ads2]
कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करा:मनोज जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन; मंत्र्यांचे शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत
















Leave a Reply