सरस्वती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात:२००७ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी २० वर्षांनंतर एकत्र येत आनंद लुटला
![]()
आमठाणा| सिल्लोड तालुक्यातील तळणी येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सण २००६ से २००७ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी २० वर्षांनंतर एकत्र येत कासोद येथील गजानन लॉन्स येथे गेट-टुगेदरचा आनंद लुटला. अनेक वर्षानंतर जुन्या मित्र मैत्रिणींची भेट झाल्याने शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री अशोक गरुड उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर माजी विद्यार्थ्यांनी विविध खेळ खेळले. या प्रसंगी सुधाकर जाधव, नंदू हिरे, प्रमोद जंगले, जनार्दन कुंटे या शिक्षकांची उपस्थिती होती.
