दहा वर्षे अपघातमुक्त सेवा; एसटी चालक जालिंदर डघळे यांचा सन्मान:प्रामाणिकपणा, शिस्त आणि सुरक्षित प्रवासी सेवेसाठी डघळेंचा गौरव‎

0
240_17784123336a006b2de5b81_jelindar.jpg




प्रतिनिधी | खंडाळा सध्याच्या धावत्या युगात अपघात टाळणे अवघड असले तरी सुरक्षितता आणि सावधगिरी बाळगल्यास ते निश्चितच कमी केले जाऊ शकतात. सध्याची जीवनशैली, वाहनांची वाढती संख्या आणि घाई गडबड यांमुळे रस्ते अपघातांचा धोका वाढला असला तरी प्रवाशांची काळजी घेत दहा वर्षांत उत्कृष्ट सेवा बजावल्याचा प्रत्यय वैजापूर तालुक्यातील कोल्ही येथील जालिंदर डघळे (चालक) परिवहन महामंडळ वैजापूर आगार यांच्या कडुन बघावयास मिळाला. या कार्याची दखल घेत विभागाच्या वतीने दहा वर्षे अपघातमुक्त सेवा बजावणारे बस चालक जालिंदर डघळे यांना मेडल, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या उत्कृष्ट आणि जबाबदारीपूर्ण सेवेमुळे आदर्श निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या सन्मान सोहळ्यात डेपो मॅनेजर किरण धनवटे यांच्या हस्ते जालिंदर डघळे यांना मेडल, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी गरुड, एस. जे. पवार, पी. एल. जाधव, एल. जी. पवार, आर. एम. वाघ आणि गिरी यांची उपस्थिती होती. सुरक्षिततेला प्राधान्य वाहतूक क्षेत्रात बस चालकाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दररोज शेकडो प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्य स्थानी पोहोचवण्याचे मोठे काम जालिंदर डघळे यांनी अत्यंत शिस्तबद्ध व प्रामाणिकपणे पार पाडले आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे, वाहन चालविताना सतर्कता ठेवणे ही त्यांची खास ओळख बनली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed