मुंबईच्या राजकारणात ‘ठाणे पॅटर्न’ची एन्ट्री:22 जिल्ह्यांत दौरा; उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात 100 मतदारसंघांवर शिंदेसेनेचे लक्ष

0
730-x-548-new-2026-05-11t064611431_1778462220.jpg




ठाणे जिल्ह्यात शिंदेसेनेचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आता मुंबईच्या रणांगणात “मुख्य समन्वयक’ म्हणून उतरले आहेत. १६ मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या या दोन महिन्यांच्या विशेष मोहिमेत मुंबईचा “रिमोट कंट्रोल’ त्यांच्या हाती असणार आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे २२ जिल्ह्यांतील ७० विधानसभा मतदारसंघांत जाऊन थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. राजकीय वर्तुळात याला “ठाणे मॉडेल’चे मुंबईत आगमन मानले जात आहे. राहुल शेवाळे (उत्तर व दक्षिण मध्य), नीलेश राणे (दक्षिण व ईशान्य) आणि योगेश कदम (उत्तर व उत्तर-पश्चिम) यासारख्या आक्रमक नेत्यांची फळी मैदानात उतरवली असली, तरी अंतिम निर्णयाची दोरी श्रीकांत शिंदेंच्या हाती असेल. मुंबईतील विखुरलेली पक्षसंघटना सांधणे आणि अंतर्गत गटबाजी मोडीत काढणे, हा या रणनीतीचा मुख्य भाग आहे. ही केवळ संघटनात्मक नियुक्ती नसून, भविष्यातील नेतृत्वाच्या दृष्टीने टाकलेले मोठे पाऊल आहे. जागावाटपाच्या वेळी भाजपसोबत होणाऱ्या “हाय-प्रोफाइल’ वाटाघाटींमध्ये श्रीकांत शिंदे यांची भूमिका निर्णायक ठरेल. त्यांच्या आधुनिक कार्यपद्धतीमुळे मुंबईतील तरुण आणि उच्चशिक्षित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. राज्यव्यापी दौरा १६ मेपासून सुरू खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा राज्यव्यापी दौरा १६ मेपासून सुरू होत आहे. या मोहिमेची सुरुवात नाशिक, धुळे, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांपासून होणार असून, त्यानंतर हा मोर्चा बीड, जालना आणि नांदेड या मराठवाड्याच्या महत्त्वाच्या जिल्ह्यांकडे वळणार आहे. या दौऱ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केवळ मोठ्या सभांवर भर न देता, १०० हून अधिक मतदारसंघांत थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधून स्थानिक प्रश्न जागेवरच सोडवण्याची रणनीती आखण्यात आली आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या बालेकिल्ल्यात पक्षसंघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत करणे आणि ग्रामीण मतदारांवर आपली पकड घट्ट करणे, हे या दौऱ्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. १५ जुलैपर्यंत चालणाऱ्या या २ महिन्यांच्या झंझावातातून “ठाणे मॉडेल’ आता संपूर्ण राज्यात राबवण्याचा शिवसेनेचा मानस दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed