आदर्श हायस्कूलचा दहावीत 100 टक्के निकाल:130 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत; भूमिका साखरे 97% गुणांसह प्रथम, जानवी येवले द्वितीय

0
3126dbcb-cef1-4bb8-897f-1ec118a10690_1778426409417.jpg




दर्यापूर येथील आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल लावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील तब्बल १३० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण होऊन शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. या निकालात एकूण १०२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. भूमिका साखरेने ९७ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. जानवी येवलेने ९५ टक्के गुणांसह द्वितीय स्थान मिळवले, तर अमृत डोले या विद्यार्थ्याने ८४ टक्के गुण घेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. विद्यालयाच्या या देदीप्यमान यशाबद्दल शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष ॲड. गजानन पुंडकर, कार्यकारिणी सदस्य प्राचार्य केशवराव गावंडे व सुभाषराव बनसोड यांनी अभिनंदन केले. याशिवाय, शाळा समिती सदस्य अच्युतराव देशमुख, पंजाबराव म्हाला, भागवत बुरघाटे, भिकनचंद सोमानी, ज्ञानदेव घाटे, शंकरसिंग रघुवंशी, शाळा निरीक्षक व्ही. डब्ल्यू. गावंडे, मुख्याध्यापक एम. आर. देशमुख, उपमुख्याध्यापक एस.बी. ठाकर, शिक्षक प्रतिनिधी अनिल भारसाकळे आणि शिक्षकेतर प्रतिनिधी प्रदीप भारसाकळे यांनीही विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण निकालामुळे पालकवर्गात उत्साहाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांच्या मार्गदर्शनाची जोड मिळाल्याने हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत असून, सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed