सभागृहाचे नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज करा:सभागृहाच्या टिपू सुलतान नावावरून वादाचे संकेत‎

0
240_177831440269feeca28c576_09hindurashtr.jpg




महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला देण्यात आलेले ‘टिपू सुलतान’ हे नाव बदलण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली असून, याबाबत संघटनांनी जिल्हाधिकारी व स्थायी समिती सभापतींना निवेदनही िदले. सभागृहाला स्वराज्यरक्षक ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्यात यावे, अशीही मागणी हिंदुत्ववाद्यांनी केली आहे. निवेदन हिंदू राष्ट्र समन्वय समितीकडून देण्यात आले. महापालकेमध्ये जून २०१२ रोजी सभा झाली होती. या सभेत स्थायी समिती सभागृहाला ‘शहिदे वतन हजरत टिपू सुलतान’, असे नाव देण्यात आले होते. तसा ठराव मंजूर करण्यात असल्याचे हिंदुत्ववादी संघटनांनी निवेदनात नमूदकेले आहे. टिपू सुलतानचा इतिहास हा हिंदू समाजाच्या भावना दुखावणारा आहे. टिपू सुलतानने वारंवार मराठा साम्राज्याविरुद्ध युद्धे करून हिंदवी स्वराज्याला क्षती पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता, असे निवेदनात म्हटले. ज्या भूमीत छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्माच्या रक्षणासाठी बलिदान दिले, त्याच भूमीत त्यांच्या शत्रूचे नाव गौरवाने घेतले जाणे क्लेशदायक आहे. त्यामुळे या सभागृहाला तातडीने ”धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे” नाव द्यावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.निवेदन सादर करताना हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यात हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक उदय महा, ॲड. मुकुंद जालनेकर, ॲड. पप्पू मोरवाल, ॲड. रवी जुंजाळेकर, ॲड. राहुल चुटके, अजिंक्य खुरसडे, श्रीकांत पिसोळकर, अमोल वानखडे,अजय खोत, अतुल वा. हुरपड, योगेश अग्रवाल, धनंजय मेहसरे, संजय ठाकूर, प्रशांत ज्ञानेश्वर पाटील, अधिवक्ता श्रुती भट, रवींद्र फाटे, नंदकिशोर व्ही. मेहरे, अधिवक्ता रश्मी व्ही. यादव, पवन थोटांगे मनोज कसुरकर, मयूर शर्मा, प्रथमेश देशमुख यांसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. सभेत केले होते सुतोवाच महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला दिलेले टिपू सुलतानचे नाव हटवणे आंदोलन होणार असल्याची घोषणा रविवार, ३ मे रोजी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती” सभेत सवाल हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली होती. त्यानुसार आता पहिल्या टप्प्यात हिंदू राष्ट्र समन्वय समितीकडून नाव बदलण्यासाठीचे निवेदन देण्यात आले. सभागृहाचे नाव बदलण्याच्या मागणीची जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाकडून ताडतडीने दखल घेण्याचा आग्रह हिंदुत्वादी संघटनांनी केला आहे. प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा हिंदू राष्ट्र समन्वय समितीने दिला आहे.निवेदन जिल्हाधिकारी वर्षा मीना, महापािलका आयुक्त डॉ .सुनील लहाने महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल, यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. गंभीर प्रकरणाची दखल न घेतल्यास आंदोलन; संघटनेचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *