श्रीमज्जगद्गुरु पलसिद्ध मठात अधिक मासानिमित्त शिवमहापूराण कथा सोहळा:21 ते 27 मे पर्यंत जगदीशानंद वाचणार कथा, सकाळी शिवपाठ
.

येथील श्रीमज्जगदगुरु पलसिद्ध महास्वामी मठात दि २१ ते २७ मे पर्यंत अधिक मासानिमित्ताने जगदिशानंद शास्त्री आळंदी देवाची यांचे शिवपूराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन कार्यक्रमात दि. २१ ते २८ मे संत शिवदास कृत शिवपाठ : पहाटे ६ ते ७ वाजता श्रींच्या समाधीस रुद्राभिषेक सकाळी ७ ते ८ वाजता, पारायण सकाळी ९ ते ११ वाजता व्याख्यान सकाळी ११ ते १२ वाजता, प्रसाद दुपारी १२ ते २ वाजता, संतपूजन दुपारी ४ वाजता, शिवमहापुराण कथा : दुपारी २ ते ५ वाजता, लक्ष्मण महाराज कृत शिवपाठ : सायंकाळी ५ ते ६ वाजता, महाप्रसाद सायंकाळी ५.३० ते ८ वाजता, कीर्तन संध्याकाळी ८.३० ते ११ वाजता होणार आहे.
रविवार, दि.२४ मे रोजी सकाळी ११ वाजता शिवदीक्षा संस्कार ( गुरुमंत्र सोहळा) बुधवार, दि.२७ मे रोजी सायंकाळी ४ वा. भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहेत. यामध्ये विविध देखावे सादर करण्यात येणार आहेत. शिवपाठ नेतृत्व काटा भजनी मंडळ, पानकन्हेरगांव भजनी मंडळ, रिसोड भजनी मंडळ, साडेगांव भजनी मंडळ व
सप्ताहात कीर्तनकारांचे होणार कीर्तन या सोहळ्यात गुरूवार, दि. २१ मे रोजी प.पु. १००८ महामंडलेश्वर श्री.ह.भ.प. अमृतानंद महाराज जोशी, बीड शुक्रवार, दि. २२ मे रोजी श्री.शि.भ.प.मन्मथअप् पा खके, चारठाणा, शनिवार, दि. २३ मे रोजी श्री. शिभप त्र्यंबक स्वामी, नंदगांवकर, रविवार, दि. २४ मे रोजी शिभप ज्योती स्वामी, चाभरेकर, सोमवार, दि. २५ मे रोजी श्री.ह.भ.प.डॉ. प्रशांत महाराज ठाकरे, अकोला, मंगळवार, २६ मे रोजी, श्री.शि.भ.प. शिवशरण गरूजी, रटकलकर, हिंगोली, बुधवार, २७ मे रोजी प.पु. १००८ परिव्रजाकाचार्य, श्री.ह.भ.प.हरीचैतन्य महाराज, पळसखेड यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
