रोटरी मोहिमेत 1,781 रुग्णांची नेत्र तपासणी; नागरिकांना लाभ
![]()
जिल्ह्यात अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्जीत फिरत्या वाहनाद्वारे नेत्र तपासणी करणाऱ्या रोटरीच्या फिरत्या नेत्र तपासणी पथकाच्या वतीने गत मार्च व एप्रिल महिन्यात अनेक गावात नेत्र रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर नेत्र उपचार करण्यात आले. या दोन महिन्यात मोफत नेत्र तपासणीचा तब्बल १७८१ रुग्णांनी लाभ घेतला. रोटरी फिरते नेत्र रुग्णालय,रोटरी नॉर्थ व आनंदीलाल चिरानिया ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने या फिरत्या नेत्र तपासणी वाहनाच्या पथकाने १ मार्च ते ३० मार्च या एक महिन्यात व्याळा, रिधोरा, तामसी, शहापूर, पारस,कुटासा,कावसा, बोराडा, चांदुर, लाखपूरी,आगर वनोजा महागाव पार्टी ताड पातुर आलेवाडी चतारी, मारोळी खापरखेड टिटवान महान खडकी भामोद आदी गावात तपासणी केली. १७८१ रुग्ण तपासणी करण्यात आली असून, ३४५ रुग्णांना चष्मे वितरित करण्यात आले. ५७ मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांची शस्त्रक्रियासाठी निवड करण्यात आली.रोटरीच्या फिरत्या नेत्र तपासणी पथकाचे केंद्र प्रमुख डॉ जुगल चिरानिया, डॉ.सुरेश तारे यांच्या मार्गदर्शनात रोटरी नॉर्थचे अध्यक्ष डॉ स्नेहा सलामपुरीया, सचिव महेश बाहेती,स्नेहल दोशी,नेत्र तपासणी सहाय्यक सुधाकर वानखडे, अमित इंगळे आदींनी यात सहभाग घेतला.
