पिंपळगाव पेठचा प्रकार:सहा फूट खोलीच्या ओढ्यावर चक्क 20 लाखांचा सिमेंट बंधारा, पाण्याची आवक कमी, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
![]()
ग्रामीण भागात जलसंधारणासाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. कागदावर विकासगंगा वाहते, मात्र प्रत्यक्षात जमिनीवर काय परिस्थिती आहे, याचे उदाहरण पिंपळगाव पेठ येथील कोके वस्तीवर पाहायला मिळत आहे. सहा फूट खोलीच्या एका चिंचोळ्या खोंगळीवर चक्क २० लाख रुपये खर्चून सिमेंट बंधारा उभारण्यात आला आहे. हा प्रकार पाहून गावकऱ्यांच्याही भुवया उंचावल्या असून, हा बंधारा पाण्यासाठी की ‘टक्केवारी’साठी मंजूर झाला, असा सवाल विचारला जात आहे. या परिसरात पाण्याची नैसर्गिक आवक मर्यादित आहे. ज्या ठिकाणी हा २० लाखांचा खर्च करण्यात आला, तिथे पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठले तरी ते दहा हजार लिटरवर जाणार नाही. ओढ्याची खोली नसताना, पाणीसाठ्याची शाश्वती नसताना एवढा मोठा निधी मंजूरच कसा झाला? तांत्रिक मान्यता देताना संबंधित इंजिनिअरने स्थळ पाहणी केली होती का? की नकाशावर हा विकास आराखडा तयार झाला, असे प्रश्न आहेत. Q- अवघ्या ६ फूट खोंगळीवर २० लाखांचा सिमेंट बंधारा उभारण्योच कारण काय? A- शेतकऱ्यांची मागणी होती. त्या नाल्याचे खोलीकारण करणार आहे. Q- पावसाळा सुरु होत असून, खोलीकरण कधी करणार? A- पुढील आठवड्यात खोलीकरणाचे काम सुरु होईल. Q – फक्त आठ दिवसांत एवढे मोठे काम कसे पूर्ण झाले? A – त्या विषयी मला सांगता येणार नाही. मी माहिती घेऊन सांगते. Q- नागरिकांच्या तक्रारी आहे? A- याबाबतची सर्व माहिती घेऊन सांगण्यात येईल. ^पिंपळगाव पेठ येथील कोके वस्तीवरील सिमेंट बंधाऱ्याबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना गांभीर्याने घेत आहोत. शासनाचा एकही रुपया वाया जाऊ देणार नाही. संबंधित कामाची तांत्रिक तपासणी, अंदाजपत्रक व पाणीसाठा क्षमतेचा अहवाल तपासूनच पुढील निर्णय घेतला जाईल. – अनिता बनकर, सभापती, पंचायत समिती रुचिका घोगरे उपविभागीय अधिकारी, लघु पाटबंधारे. तांत्रिक तपासणी होईल
