भडजीमध्ये 20 वर्षीय विवाहितेचा गळफास:खुलताबाद ठाण्यात नोंद; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
![]()
खुलताबाद तालुक्यातील भडजी येथे एका २० वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आपली आत्महत्या केल्याची घटना शनिवार (९ मे) सकाळी उघडकीस आली. गायत्री आकाश वाकळे असे मृत विवाहितेचे नाव आहे. गंगापूर तालुक्यातील आपेगाव येथील गायत्री हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी भडजी येथील आकाश वाकळे यांच्याशी झाला होता. वाकळे कुटुंब खुलताबाद-फुलंब्री रोडवरील भडजी गावाजवळ वास्तव्यास आहे. गायत्रीला नऊ महिन्यांची एक मुलगी आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास, घरातील सर्वजण झोपेत असताना गायत्रीने राहत्या घरातील लोखंडी पाईपाला साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. सकाळी नऊ महिन्यांची मुलगी रडत असल्याने घरातील सदस्यांना जाग आली. जेव्हा त्यांनी गायत्रीच्या खोलीत पाहिले, तेव्हा तिने गळफास घेतल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच खुलताबादचे पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश झलवार आणि हेडकॉन्स्टेबल वारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. ९ महिन्यांचे चिमुकले बाळ झाले पोरके वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना गायसमुद्रे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. याप्रकरणी खुलताबाद ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद आहे. गायत्रीने इतक्या कमी वयात आणि पदरात लहान मुलगी असताना टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ९ महिन्यांच्या चिमुरडीच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपल्याने उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले होते.
