रिकामे सिलिंडर रस्त्यावर टाकून रास्तारोको:शेंदुर्णीत सिलिंडर वितरण विस्कळीत; सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त ग्राहकांनी केले आंदोलन
![]()
परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून गॅस सिलिंडरचे वितरण विस्कळीत झाल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार चकरा मारूनही गॅस मिळत नसल्याने शनिवारी सकाळी ११ वाजता संतप्त ग्राहकांनी रिकाम्या टाक्या रस्त्यावर आडव्या लावून रस्ता रोको आंदोल
.
शेंदुर्णी परिसरात इंडियन गॅसचे एकमेव वितरक आहेत. शनिवारी सकाळी गॅस मिळवण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना “सिलिंडर शिल्लक नाही’ असे नेहमीचेच उत्तर मिळाल्याने त्यांचा संयम सुटला. व त्यांनी आंदोलन केले.
स्वयंपाकाची मोठी पंचाईत घरातील सिलिंडर संपल्याने महिलांना चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. मात्र, सध्याच्या काळात चुली किंवा लाकूडफाटा उपलब्ध नसल्याने गृहिणींची मोठी अडचण होत आहे. “चुलीवर स्वयंपाक करण्याची सवय राहिलेली नाही आणि गॅस वेळेवर मिळत नाही, मग आम्ही करायचे काय?” असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला आहे.
