वादळाने वीज यंत्रणेचे नुकसान; पुरवठा खंडित, शहरातही फटका:मध्यरात्री शहरात तर तिवसा परिसरात दुपारी हलक्या पावसाची हजेरी‎

0
240_177833975469ff4faa58476_img20260509wa.jpg




मागील तीन ते चार दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. त्या बदलामुळे उष्णतेच्या चटक्यांपासून अमरावतीकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र शुक्रवारी ८ मे रोजी मध्यरात्री झालेल्या वादळामुळे शहरासह जिल्ह्यातील काही भागात वीज यंत्रणेला फटका बसला होता. त्यामुळे संबधित ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान शनिवारी ९ मे रोजी दुपारी तिवसा, गुरूदेवनगर, खोलापूर भागात वादळामुळे काही नुकसान झाले असून, याच दरम्यान काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजताच्या सुमारास शहरातील काही भागात सोसाट्याचा वारा सुटला. या वेळी वादळाचा सर्वाधिक जोर शहरातील साईनगर, नवाथे भागात होता. साईनगर भागात वादळामुळे एक ते दोन ठिकाणी झाडं कोसळले होते. त्यामुळे वीज वाहिनीला नुकसान पोहोचले होते आणि साईनगर, पारीजातकॉलनी व परिसरात मध्यरात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत वीजपुरवठा बंद होता. उर्वरित. पान ४ ११ मे पर्यंत वातावरणात बदल अपेक्षित नाही. त्यामुळे सद्या आहे तसेच वातावरण राहील. या काळात वाऱ्या सह हलक्या पावसाची, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. या काळात वाऱ्याची गती ३० ते ४५ प्रतितास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. डॉ. प्रवीणकुमार, हवामानशा स्त्रज्ञ, आरएमसी, नागपूर. वाऱ्यासह पावसाची , गारपिटीची शक्यता ८ तास वीज खंडित शुक्रवारी मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह पावसाने तडाखा दिला. या मुळे सातुर्णा, साईनगर, अकोलीत ८ तास विजेचा खंड होता . रात्री अडीचला खंडित वीज पुरवठा सकाळी साडेअकरा वाजता वीजपुरवठा पुर्ववत झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *