80 लाखांचे बिल, 5 लाखांची लाच घेताना अभियंता अटकेत:जळगावात सा.बां.च्या शाखा अभियंत्यावर कारवाई

0
orig_new-project-2026-05-10t065804592_1778376529.jpg




काँक्रीट रस्ता कामाचे ८० लाखांच्या बिलाच्या मोबदल्यात पाच लाखांची लाच घेणारा सा.बां.चा शाखा अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे (५४, रा. जळगाव) याला शनिवारी रंगेहाथ पकडले. त्याने १५ लाखांची मागणी केली होती. कार्यालयासमोर कारमधील सिटखाली लाचेची रक्कम ठेवण्यास त्याने सांगितले होते. त्याला एक लाख रुपये वेतन आहे. तक्रारदार सब-कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी जळगाव शहरातील वॉर्ड क्र. १४ विनोबानगरात ८० लाख ३९ हजारांचे काम पूर्ण केले आहे. या कामाचे ३८ लाख ४९ हजार रुपयांचे बिल अद्याप प्रलंबित होते. हे बिल मंजूर करून देण्यासाठी अहिरेने तक्रारदाराकडे १८ लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती १५ लाख रुपये देण्याचे ठरले होते. अहिरेकडे १८६ कोटींच्या रस्ते कामाची जबाबदारी पीडब्ल्यूच्या बांधकाम विभागात चार ते पाच शाखा अभियंते आहेत. त्यापैकी अहिरे एक आहे. तो सुरुवातीला स्थापत्य सहाय्यक अभियंता होता. त्याला ४/५ वर्षांपूर्वी प्रमोशन मिळून शाखा अभियंता झाला आहे. त्याचा पगार १ लाख रुपये आहे. त्याच्या पाचपट रक्कमेची लाच त्याने स्वीकारली आहे. शाखा अभियंता म्हणून त्याच्याकडे जळगाव शहरातील १८६ कोटींच्या सिमेंटचे रस्ते व समांतर रस्ते आदींची जबाबदारी होती. अहिरे यांच्या वडीलांचे मोहन नगरात जुने घर होते. ते पाडून त्याने दोन वर्षांपूर्वीच तीन मजली टोलेजंग बंगला बांधला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed