भाेंदूगिरीचा कॅप्टन:भोंदू खरातचा मुक्काम नाशिकच्या कारागृहात, शिर्डी न्यायालयाकडून 14 दिवस न्यायालयीन कोठडी

0
orig_new-project-2026-05-02t101017470_1778375461.jpg




भक्ती आणि श्रद्धेच्या नावाखाली मायाजाल विणणाऱ्या भोंदू अशोक खरातची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. शिर्डी न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. खरातच्या भोंदूगिरीचा गेम ओव्हर झाला असताना अवैध सावकारीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी त्याची पत्नी कल्पना खरात अद्याप नॉट रिचेबल असल्याने शिर्डी पोलिसांच्या तपासावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. खरातला शनिवारी शिर्डी न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपासी पथकाने चार दिवसांची कोठडीची मागणी केली. कल्पना खरात फरार आहे, ती कुठे आहे याचा तपास करण्याकरिता कोठडीची मागणी केली. बचाव पक्षाच्या वकिलांनी खरात पाच दिवसांपासून कोठडीत आहे. कल्पना खरातवर गुन्हा दाखल झाल्यापासून ती फरार झाली आहे. याबाबत कोठडीत असलेला खरात काय सांगणार, असा युक्तिवाद केला दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. अशोक खरात याचा ताबा ईडी घेणार? खरातविरोधात मुंबईमध्ये सक्त- वसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात ताबा मिळवण्याकरिता अर्ज दिला आहे. सोमवारी अर्जावर सुनावणी होणार असून ईडीकडून खरातचा ताबा घेण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed