खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीला अपघात:मुंबई-पुणे महामार्गावरील घटना, गाडीतील सर्वजण सुखरूप असल्याची दिली माहिती

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-09t214847368_1778343572.jpg




राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात झाला असून गाडीतील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माहिती दिली की, आज पुणे ते मुंबई प्रवास करत असताना, महामार्गावर मला एक अत्यंत कटू अनुभव आला. वाहन क्रमांक GJ 13 CF 5257 ने बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे, माझ्या गाडीला बाजूने जोरदार धडक दिली. सुदैवाने, सर्वजण सुखरूप आहेत. पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, अशा प्रकारच्या घटना ही एक गंभीर आठवण करून देतात की, आपल्या रस्त्यांवर अतिवेगाने वाहन चालवणे आणि निष्काळजीपणा करणे यामुळे असंख्य लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतात. मी सर्वांना आवाहन करतो की, कृपया सीट बेल्ट वापरा, सावध राहा आणि जबाबदारीने वाहन चालवा; जेणेकरून आपले महामार्ग सर्वांसाठी अधिक सुरक्षित बनतील, असे आवाहनही सुळे यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हेलिकॉप्टर अपघात टळला दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही हेलिकॉप्टरला मोठा अपघात होणार होता. महालक्ष्मी रेसकोर्स येथून मुरबाडमधील एका लग्नसोहळ्यासाठी जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर कल्याण परिसरात अचानक आलेल्या वादळात अडकले होते. सुदैवाने, पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून हेलिकॉप्टरमधील सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहेत. या थरारक घटनेनंतर उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे जुहू विमानतळावर तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले असून, या प्रसंगावधानामुळे मोठा धोका टळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed