प्रा. विजय आठवले यांना पीएचडी पदवी:जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीवर प्रकाशझाेत‎

0
240_177824022369fdcadf02f5b_08vijaathvle.jpg




जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळ बुलंद करण्यासाठी संघर्ष करणारे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय विश्वनाथ आठवले यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने आचार्य (पीएच डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ संतोष बनसोड यांच्या मार्गदर्शनात हा शोधप्रबंध सादर करण्यात आला होता. प्रा. आठवले यांच्या संशोधनाचा विषय “महाराष्ट्राच्या राजकीय जडणघडणीत अकोला जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे योगदान : एक ऐतिहासिक अध्ययन” हा होता. विषय महत्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण विषय मानला जात आहे. या संशोधनातून त्यांनी जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचा सखोल राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक, सांस्कृतिक आढावा घेतला असून आंबेडकरी चळवळीचा ऐतिहासिक प्रवास प्रभावीपणे अधोरेखित केला आहे.
या यशाचे श्रेय त्यांनी संत गजानन महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार गजाननराव दाळू गुरुजी, सचिव ओमप्रकाशजी दाळू, कर्मयोगी आप्पासाहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिवाकर गावंडे, प्राचार्य गोपाल वैराळे, डॉ. बी.आर. मस्के, डॉ. संतोष हुशे डॉ चंद्रकांत सरदार,प्राचार्य अनिल राठोड,डॉ नरेश कवाडे डॉ संदीप डोंगरे,डॉ गणेश पोटे डॉ योगेश वडतकर डॉ नितीन सराफ,डॉ रवींद्र मुंद्रे,डॉ विनोद खैरे, डॉ बी. एच.किर्दक डॉ.भानुदास जामनेकर,डॉ प्रमोद चव्हाण,डॉ शैलेंद्र चव्हाण डॉ धीरज नजान, डॉ दीपक राऊत,डॉ कल्पना मेहरे ,डॉ दिवाकर संदांशिव डॉ सागर नारखेडे डॉ प्रशांत ठाकरे डॉ सिद्धार्थ जाधव डॉ,कुसुमेंद्र सोनटक्के, डॉ मिलिंद तायडे,डॉ प्रसन्ना बागडे,, डॉ. सुरेश पंडित, डॉ मुनेश्वर जमाईवार पॅक्टो संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण खंडारे, प्रा. सुनील कांबळे, प्रा. शैलेश इंगळे आणि अशोक प्रतिष्ठानचे अनिल गवई, मधुसूदन भटकर अनिल तायडे भूषण गायकवाड विद्याधर मोहोड, संदेश गवई आदींना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed