हिंगणी तलाव परिसरात 60 शेतकऱ्यांच्या विद्युत केबल्स लंपास:लाखोंचे नुकसान, वैराग पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान, 15 दिवसांत केबल चोरीची दुसरी घटना
![]()
बार्शी तालुक्यातील पिंपरी (पा) व परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसवणारी केबल चोरीची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. हिंगणी मध्यम प्रकल्पाच्या तलाव परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ९८०० फूट लांबीची व सुमारे १ लाख १७ हजार ६०० रुपयांची विद्युत क
.
पिंपरी (पा) येथील शेतकरी चेतन जयकुमार काशिद (वय ३७) यांनी वैराग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या गट क्रमांक १४७ मधील शेतासाठी हिंगणी तलावातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी तलावावर बसवलेल्या १५ एचपी मोटरला सुमारे १०० मीटर केबलद्वारे वीजपुरवठा केला जात होता. दि. ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नियमित पाणी देण्यात आल्यानंतर, दि. ५ मे रोजी सकाळी ७ वाजता मोटर पाहण्यासाठी तलावावर गेले असता, पेटीपासून मोटरपर्यंतची केबल पूर्णपणे गायब झाल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे, परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल्स देखील चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
शेतकऱ्यांनी महावितरणकडे चौकशी केली असता, त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हा प्रकार चोरीचा असल्याची खात्री झाली. एकूण ५२ शेतकऱ्यांच्या केबल्स चोरीस गेल्या असून, प्रत्येकी सुमारे २५० फूट केबल अशा एकूण ९८०० फूट केबलचा समावेश आहे. इंडेक्स, फॉल्कॉन, इंडो कॅब, फिनोलेक्स अशा विविध कंपन्यांच्या केबल्सचा यात समावेश असून एकूण नुकसान अंदाजे १.१७ लाख रुपये आहे. घटनामुळे शेतकरी वर्गात नाराजी ^या मोटर चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. वारंवार होत असलेल्या अशा चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे . परंतू लवकरात लवकर चोरट्यांचा बंदोबस्त आम्ही करणार आहोत. कुंदन गावडे, पोलिस निरीक्षक शेतकऱ्यांना सध्या कोण वाली नाही ^पंधरा दिवसांपूर्वीच १५ शेतकऱ्यांचे मोटार केबल चोरी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले होते. आता पुन्हा ऐकदा चोरट्याने ६० शेतकऱ्याची मोटार व केबल चोरी केल्याने त्यांच्या आर्थिक नुकसाना बरोबर यांच्या कंबरडा देखील मोडले आहे. शेतकऱ्यांना सध्या कोण वाली आहे का नाही , असा प्रश्न निर्माण झाला आहे. नितीन काशिद , शेतकरी
१५ दिवसांत दुसरी चोरी; शेतकऱ्यांत संताप विशेष म्हणजे, अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत ही दुसरी मोठी केबल चोरीची घटना घडली आहे. यापूर्वीही याच परिसरात अशाच प्रकारे केबल चोरी झाली होती, मात्र त्या प्रकरणातील चोरटे अद्याप सापडलेले नाहीत. वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. “या भागात केबल चोरीच्या घटना सतत होत असून प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
