राऊतांनी हनुमंताच्या नव्हे, रावणाच्या गप्पा कराव्यात:भगव्याऐवजी हिरवा झेंडा असता तर राऊतांना आनंद झाला असता- नवनाथ बन

0
new-project-2026-04-28t115726138_1778137825.jpg




संजय राऊत यांनी हनुमंताच्या गप्पा करू नये. तुम्ही रावणाच्या गप्पा कराव्यात कारण तो तुमचे आराध्य झाला आहे. रावणाने जसा सीतामातेचे हरण केले तसाच त्रास तुम्ही महिलांना देता आहात, त्यामुळे प्रभु श्री राम आणि हनुमंताचे नाव घेऊ नका, तुम्हाला तो अधिकार नाही, असा टोला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. तुम्ही रावणाचे भक्त आहात, त्याची जशी निष्ठा होती तशीच तुमचा निष्ठा आहे. रावण जशी अराजकता पसरवत होता तसाच उबाठाचे लोकांना अहंकार आला आहे. नवनाथ बन म्हणाले की, कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटी रुपये खर्च होत असल्याने राऊतांच्या पोटात दुखत आहे. हाच कार्यक्रम जर हिरव्यासाठी, औरंगजेबाच्या कबरीच्या सुशोभीकरणावर खर्च चालतो, इस्तेमाच्या असता तर 70 हजार कोटी रुपये असता तरी खुश झाले असते. हा खर्च हिंदू बांधवांच्या सुरक्षेसाठी आणि व्यवस्थेसाठी होत असल्याने यांना त्रास होत आहे. मुंबई मनपात सत्ता असताना तुम्ही किती गुजराती ठेकेदारांना ठेके दिले हे एकदा बघा त्यांची यादी संदीप देशपांडे यांनी वाचून दाखवली आहे. भाजप ठेकेदार नाही सेवेदार नवनाथ बन म्हणाले की, भाजप ही काय हिंदुत्वाची ठेकेदार आहे का असा सवाल राऊत करत आहेत, भाजप हा ठेकेदार नाही तर सेवेदार आहे. आम्ही हिंदुत्ववादासाठी सेवा करतो, आम्ही जनतेची सेवा करतो. उद्धव ठाकरेंना बोलावले नाही, कारण त्यांना अयोध्येला बोलावले होते पण तिथे ते गेले नाही. आजपर्यंत ते तिथे गेले नाही, कारण त्यांना हिरव्या मतांची चिंता आहे. प्रभु श्री रामांचे दर्शन घेतले तर दाढ्यांची आणि हिरव्याची मते मिळणार नाही म्हणून तुम्ही तिकडे गेला नाहीत. ज्यांना प्रभु श्री रामाच्या दर्शनाला यावे वाटले नाही ते धर्म ध्वजाच्या कार्यक्रमाला आले असते का? असा सवाल बन यांनी केला आहे. राऊतांना ध्वजाचे महत्त्व कळणार नाही नवनाथ बन म्हणाले की, कुंभमेळ्यासाठी धर्म ध्वजाची स्थापना करण्यात आली. हा ध्वल फडकला आणि संजय राऊत यांच्या पोटात दुखायला लागले. भगव्या ऐवजीजर हिरवा झेंडा फडकला असता तर राऊतांना खूप आनंद झाला असता. त्यांनी धर्म ध्वज फडकला म्हणून पोटात दुखत आहे. हिंदूत्च सोडल्यामुळे उबाठाची ही अवस्था झाली आहे. धर्म ध्वज हिंदू नागरिकांचा आहे, जो आपली संस्कृती जपतो. राऊतांना त्यांचे महत्त्व कळणार नाही, कारण त्यांनी हिरवा हाती घेतला आहे. हिंदुत्वाशिवाय फिरल्यास फायदा नाही नवनाथ बन म्हणाले की,पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यानंतर घरात बसून राहणाऱ्या संजय राऊत यांना कळले की लोकांमध्ये गेलो नाही तर ममता बॅनर्जीसारखा आपला पराभव होईल. म्हणून त्यांनी सकाळी उठून नाशिक गाठत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. राऊत तुम्ही कितीही फेऱ्या नाशिकमध्ये मारल्या तरी तुमचा पक्षाला चांगले दिवस येणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही हिंदुत्ववादाची साथ देत नाहीत तोपर्यंत तुमची पक्षबांधणी होऊ शकत नाही. तुम्ही नाशिक, जळगाव, धुळे कुठेही फिरा जनता तुमच्या पाठिशी उभी राहणार नाही. राऊतांनी पवार, ठाकरेंना सवाल करावा नवनाथ बन म्हणाले की, अदानी,अंबानी यांच्यावर टीका करण्यापूर्वी अंबानीच्या घरी जात कोणी डान्स केला होता. मातोश्रीवर कोणासाठी रेड कार्पेट असते, हा सवाल उद्धव ठाकरेंना केला पाहिजे. संजय राऊत यांनी शरद पवारांना अदानीबद्दल प्रश्न केला पाहिजे. आम्ही जनतेच्या हिताची भूमिका घेत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed