33 वाघांसह शेकडो वन्यजीवांचे पर्यटकांना दर्शन:मेळघाटात बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात 264 मचाणांवर ‘निसर्ग अनुभव”
![]()
निसर्ग प्रेमी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते, असा ‘निसर्ग अनुभव’ उपक्रम १ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या पर्वावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पात उत्साहात पार पडला. पौर्णिमेच्या लख्ख चांदण्यात सलग १२ तास घनदाट वनातील २६४ मचाणांवर रात्रभर बसून निसर्गप्रेमीं
.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक ३० वाघ दिसले या रोमांचक मोहिमेत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात ३० वाघ, १६ बिबट, ११० अस्वल, ४१३ रानगवा, ८५६ सांबर आणि १२१ नीलगाय या वन्यजीवांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तसेच पांढरकवडा वन्यजीव विभागात ३ वाघ, २ बिबट, १६४ रानडुक्कर, २५ अस्वल दिसून आले. अकोला वन्यजीव विभागातही १६ बिबट, २५ अस्वल, २ तडस, २३ कोल्हे, ६० रानडुक्कर, २०२ चितळ आणि ३६५ नीलगाय असे वैविध्यपूर्ण वन्यजीव पर्यटकांच्या दृष्टीस पडले.
