जिल्ह्यात 2.42 लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, 15 ते 20 मे या कालावधीत पाठ्यपुस्तके पोहोचणार; जिल्ह्यातील शाळांमध्ये वाटप‎

0
240_177798323369f9df0186935_pustak.jpg




यंदाच्या शैक्षणिक सत्र २०२६ – २७ मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २,१४१ शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या एकूण दोन लाख ४२ हजार ७५५ विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे शाळा स्तरावर वितरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय शिक्षण विभागाच्या वतीने बालभारती पोर्टलवर पुस्तकांची मागणी एप्रिल मध्ये नोंदवली आहे. पुस्तका अभावी शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये, पालकांवर पुस्तक खरेदीचा आर्थिक भुर्दंड पडू नये यासाठी राज्य सरकारने २००२ -०३ या शैक्षणिक वर्षात मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्याचा श्रीगणेशा केला आहे. या योजनेच्या आरंभापासून दरवर्षी जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे आणि यापुढेही ही योजना सुरू असेपर्यंत मिळत राहणार आहे. जिल्ह्यातील मराठी, उर्दू व हिंदी या माध्यमांच्या जिल्ह्यातील एकूण २,१४१ शाळांना लाभ मिळणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद व नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १,५१८, खासगी अनुदानित ४४१,अंशतः अनुदानित १३०, आदिवासी आश्रम शाळा २१,खाजगी अनुदानित आश्रम शाळा २३, समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती,जमातीसाठी असलेल्या ८ शाळांना या मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ मिळणार आहे. पहिल्याच दिवशी पुस्तकांची भेट यंदाच्या शैक्षणिक सत्राची पहिली घंटा १५ जून ला वाजणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे बालभारती कडून या पाठ्यपुस्तकाचा तालुकास्तरावर १५ ते २० मे या कालावधीत पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *