Pune Grandfather Arrested For Pocso Case; BNS Applied

0
db-temp-cover-marathi-2026-05-06t094918395_1778042898.jpg



पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीची घटना ताजी असतानाच, पुण्याच्या मध्यवर्ती पर्वती परिसरात एका ७० वर्षीय व्यक्तीने नात्याची सर्व मर्यादा ओलांडून आपल्या सख्ख्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अंबादास

.

पीडित नऊ वर्षांच्या मुलीचे आई-वडील मजुरीच्या कामासाठी घराबाहेर गेले असताना, मुलगी तिच्या आजोबांसोबत घरात होती. रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी अंबादास जाधव याने नातीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा सुरू केला. मुलीचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या एका महिलेला संशय आला. तिने तत्काळ घराच्या फटीतून डोकावून पाहिले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. तिने आरडाओरडा करून नागरिकांना गोळा केले आणि पीडित मुलीची नराधमाच्या तावडीतून सुटका केली.

पोलिस माहिती आणि गुन्हा दाखल

या घटनेबाबत माहिती देताना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “घटनेची माहिती मिळताच आम्ही तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार, ‘पेनेट्रेटिव्ह असॉल्ट’ झाल्याचे दिसून आले नाही, तरीही आरोपीने केलेले कृत्य हे बलात्काराच्या व्याख्येत बसणारे असल्याने आम्ही अत्यंत गंभीर कलमे लावली आहेत.”

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पर्वती पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) कलम ६, १० आणि भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम ७५, ६४ व ६६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मुलीची प्रकृती स्थिर

पोलिस प्रशासनाने आज पत्रकार परिषदेत माहिती दिली की, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून तिची प्रकृती आता व्यवस्थित आहे. तिला तिच्या पालकांकडे सोपवण्यात आले आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार असून पोलिस अधिक तपासासाठी त्याची कोठडी मागणार आहेत.

परिसरात रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन

घटनेची माहिती मिळताच पर्वती पायथा परिसरात नागरिकांचा मोठा जमाव जमला होता. संतप्त नागरिकांनी आरोपीला चोप दिला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला जमावाच्या तावडीतून सोडवत पोलिस ठाण्यात नेले. या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत परिसरात ठिय्या आंदोलन केले, ज्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. अतिरिक्त पोलिस कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed