भोंदू अशोक खरात प्रकरण:खरातच्या अटकेने शिर्डीतील ‎‎जमीन माफियांचे धाबे दणाणले‎

0
new-project-2026-05-02t101017470_1778042109.jpg




शिर्डी परिसरात जमीन व्यवहार, खाजगी‎ सावकार की आणि आर्थिक गैरप्रकारांच्या‎ मालिकेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‎भोंदू अशोक खरात याला राहाता न्यायालयाने‎ जमीन खरेदी फसवणूक प्रकरणी 9 मेपर्यंत 5 ‎दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यामुळे या‎प्रकरणातील तपासाला निर्णायक वळण‎ मिळण्याची शक्यता व्यक्त होत‎ आहे. फसवणुकीच्या या प्रकरणाची व्याप्ती‎ पाहता खरातच्या अटकेने शिर्डीतील जमीन ‎माफियांचे धाबे दणाणले असून तपासात मोठे ‎मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. ‎सोमवारी नाशिकच्या विशेष तपास पथकाने‎ (एसआयटी) खरातला शिर्डी पोलिसांच्या‎ स्वाधीन केले. मंगळवारी कडक पोलिस ‎बंदोबस्तात त्याला राहाता न्यायालयात हजर‎ करण्यात आले. यावेळी पोलिसांनी खरातच्या‎ गुन्ह्यांची जंत्रीच न्यायालयासमोर वाचून ‎दाखवली. खरातला पोलिस कोठडी ‎मिळाल्याने आता तपासाला वेग येणार आहे.‎ पोलिसांनी शिर्डीतील शेतकऱ्यांची फसवणूक‎करून जमिनी हडपण्याचा नेमका मास्टर प्लॅन‎काय होता?, व्याजाच्या व्यवसायात‎ खरातसोबत आणखी कोण-कोण ”पार्टनर”‎आहेत?, खरातने आतापर्यंत शिर्डी आणि‎ परिसरात किती मालमत्ता गोळा केली आहे? खरातची दाढी वाढलेली,‎ डोळे खोलवर‎ दाढी वाढलेली, डोळे खोलवर ‎गेलेल्या अशोक खरातला‎ पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ‎राहाता न्यायालयात आणले. ‎पोलिसांच्या गराड्यात त्याची‎ न्यायालयाकडे ने-आण करण्यात‎ आली.‎ या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.‎ पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्या ‎नेतृत्वाखालील टीम खरातची सखोल‎ चौकशी करणार आहे. या चौकशीतून‎ अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची ‎शक्यता असून या प्रकरणात आणखी मोठे ‎खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत‎ नाही.‎ राहाता कोर्टातून लाईव्ह रिपोर्ट‎ (तपासी अधिकारी पोलिस‎ उपनिरिक्षक निवांत जाधव) : • 14‎ व्यवहारांत 5.52 कोटींची उलाढाल; हा ‎पैसा आला कुठून? • फरार आरोपी‎ कल्पना खरात हिचा पत्ता शोधण्यासाठी ‎कोठडी हवी. • यात अजून अनेक बडे मासे‎ सहभागी असण्याची दाट शक्यता.‎ सरकारी वकील ॲड. गौरव बोर्डे : • ‎खरातच्या नावावर विविध पतसंस्थांत ‎अनेक बनावट/नॉमिनी खाती. • 70‎ कोटींच्या संशयास्पद उलाढालीचा तपास‎ करणे गरजेचे. • जमीन मालकाची‎ पद्धतशीरपणे केलेली फसवणूक गंभीर‎आहे.‎ बचाव पक्ष (खरातचे वकील) • गुन्हा‎ दाखल करण्यास फिर्यादीने विलंब का‎ केला? • सर्व रक्कम खात्यावर जमा केली‎ आहे, मग फसवणूक कशी? • हा‎ सावकारकीचा नाही, तर जमीन ‎खरेदी-विक्रीचा कायदेशीर व्यवहार.‎ जमिनी व मालमत्तांची माहिती मिळेल‎ भोंदू अशोक खरातला पोलिस कोठडी मिळाल्याने‎ तपासात त्याने केलेल्या गुन्ह्यांची माहिती समोर येईल.‎ शिर्डीतील शेतकऱ्यांची फसवणूक करून जमीन हडप ‎करण्याचा उद्देश स्पष्ट होईल, जमीन खरेदी फसवणूक ‎प्रकरणात खरातला मदत करणाऱ्या व्यक्तींची नावे समोर ‎येतील, शिर्डी आणि परिसरात आतापर्यंत खरातने किती‎ जमिनी व मालमत्ता खरेदी केल्या, याची माहिती‎ तपासातून उघड होईल. -ॲड. शुभम गोंदकर, शिर्डी.‎


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed