नसरापूर येथील घटनेचे पंढरीत तीव्र पडसाद:फासणाऱ्या घटनेचा सर्वपक्षीय निषेध; स्त्री सन्मानासाठी पंढरपूरकर एकवटले‎

0
250_177799745669fa1690680eb_15585990270.jpg




नसरापूर येथील निष्पाप बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद पंढरपुरात उमटले असून, आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध संघटना आणि संतप्त नागरिकांनी एकत्र येत या घृणास्पद कृत्याचा जाहीर निषेध केला. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे जनमानसात प्रचंड संतापाची लाट आहे. भर चौकात जमलेल्या आंदोलकांनी “आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. संबंधित नराधमाला कोणत्याही परिस्थितीत फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी आग्रही मागणी यावेळी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या . फास्ट ट्रॅक कोर्ट: नसरापूर प्रकरणातील आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवावा. . कठोर शिक्षा: नराधमास विनाविलंब फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. . सुरक्षा व्यवस्था: महिला आणि चिमुकल्यांच्या सुरक्षेसाठी शहरात व ग्रामीण भागात गस्त वाढवून कडक कायदे लागू करावेत. नेहमी भक्तीरसात न्हाऊन निघणाऱ्या पंढरपुरात आज अन्यायाविरुद्धचा आक्रोश पाहायला मिळाला. नसरापूरच्या घटनेने केवळ एका कुटुंबावरच नव्हे, तर माणुसकीवर घाला घातला असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील निदर्शनांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असून, लोकांचा संताप अनावर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed