बापाच्या नात्याला काळिमा:गुणपत्रिकेवरील खाडाखोडच्या संशयावरून चिमुकलीची करवतीने निर्घृण हत्या, घरही दिले पेटवून

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-05t184604803_1777987006.jpg




पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना उघडकीस आली असून, एका नराधम बापाने केवळ संशयापोटी आपल्या 9 वर्षांच्या चिमुकलीची इलेक्ट्रिक करवतीने निर्घृण हत्या केली आहे. पोटच्या गोळ्याची अशा अमानवी पद्धतीने हत्या केल्याच्या या अघोरी कृत्यामुळे संपूर्ण दौंड तालुका हादरला आहे. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या क्रूर घटनेने पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, आरोपी बापाविरुद्ध सर्वत्र कडक कारवाईची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना 3 मे 2026 रोजी दुपारी 3.15 च्या सुमारास घडली असून, आपला मुलगा संस्कार याच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर कोणीतरी खाडाखोड केल्याच्या केवळ संशयावरून आरोपी शांताराम चव्हाण याने हे टोकाचे पाऊल उचलले. रागाच्या भरात असलेल्या शांतारामने आपली 9 वर्षांची मुलगी अनामिका हिच्यावर लाकूड कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक करवतीने निर्घृण हल्ला केला, ज्यामध्ये या निष्पाप चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मृतदेह कपड्यात गुंडाळून घराला आग लावली मुलीची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी शांताराम चव्हाण याने क्रूरतेचा कळस गाठत हा प्रकार अपघात असल्याचे भासवण्यासाठी तिचा मृतदेह कपड्यात गुंडाळून घराला आग लावून दिली. पुराव्यांची विल्हेवाट लावण्याच्या या भयानक कृत्यात आरोपीला चिंगु भोसले हिने साथ दिली आणि ही गंभीर बाब पोलिसांपासून जाणीवपूर्वक लपवून ठेवली, ज्यामुळे पोलिसांनी तिच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. या अघोरी कृत्यामुळे या हत्याकांडाचे गांभीर्य अधिकच वाढले असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मन सुन्न करणारी घटना निलेश आत्माराम फडणीस यांच्या फिर्यादीनुसार दौंड पोलिसांनी आरोपी शांताराम चव्हाण आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. स्वतःच्या पोटच्या मुलीचा अशा अमानवी आणि निर्घृण पद्धतीने बळी घेणाऱ्या बापाच्या या कृत्यामुळे संपूर्ण समाजमन सुन्न झाले असून, ही घटना मानवी क्रूरतेचा कळस मानली जात आहे. या धक्कादायक हत्याकांडाने समाजात वाढत चाललेली हिंसक प्रवृत्ती आणि ढासळती मानसिकता यावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed