भोंदू अशोक खरातच्या पोलिस कोठडीत वाढ:TCS प्रकरण संघटित कटाचा भाग; तर नसरापूरच्या आरोपीचे वकीलपत्र घेणार नसल्याची वकिलांची भूमिका

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-05t174513592_1777983352.jpg




नाशिकमधील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी भोंदू अशोक खरातला आज कडक पोलिस बंदोबस्तात राहाता सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. जमीन खरेदी आणि अवैध सावकारी प्रकरणी शिर्डी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून, सुरक्षेच्या कारणास्तव आरसीपी तुकडीसह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या प्रकरणातील गुंतागुंत पाहता, आरोपीने केलेल्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याला न्यायालयात सादर केले. तसेच आता अशोक खरातच्या पोलिस कोठडीत वाढ झाली असून आता 9 मे पर्यंत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. सुनावणी दरम्यान सरकारी वकील ॲड. गौरव बोर्डे यांनी जोरदार युक्तिवाद करत आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. आरोपीने जमीन खरेदीसाठी लागणारी कोट्यवधींची रक्कम नेमकी कुठून आणली आणि हे व्यवहार कोणाच्या मदतीने केले, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तपासात खरातचे नाव नॉमिनी असलेली अनेक बँक खाती विविध पतसंस्थांमध्ये आढळली असून, त्यातून मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी सखोल तपासाची गरज व्यक्त करण्यात आली. नाशिक टीसीएस प्रकरण बहुआयामी आणि संघटित कटाचा भाग नाशिकच्या टीसीएस कार्यालयातील लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि कथित धर्मांतर प्रकरणाला आता अधिक गंभीर वळण मिळाले असून, मुख्य आरोपी निदा खान हिचा अटकपूर्व जामीन नाशिक सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाचे वर्णन ‘बहुआयामी आणि संघटित कटाचा भाग’ असे केल्याने या प्रकरणातील गुंतागुंत अधिक स्पष्ट झाली आहे. जामीन अर्ज फेटाळल्यामुळे तपास यंत्रणांना या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी मोठी दिशा मिळाली असून, या संघटित कटामागील धक्कादायक बाबी आणि मोठे रॅकेट समोर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नसरापूरच्या आरोपीचे वकील पत्र कोणीही घेणार नाही- भोर बार असोसिएशन पुण्याच्या नसरापूर लैंगिक अत्याचार व हत्या प्रकरणी आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. नसरापूर प्रकरणातील आरोपीचे वकील पत्र कोणीही घेणार नसल्याची भूमिका भोर बार असोसिएशनने घेतली आहे. कोणतेहे वकील या आरोपीचे वकीलपत्र घेणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भोरच्या वकिलांच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय उरणकर म्हटले की, हा अत्यंत लांछनास्पद प्रकार होता. हा प्रकार समजल्यानंतर भोर वकिलांच्या असोसिएशनची तातडीने बैठक बोलावली. 2 मे रोजी बैठक झाली आणि सर्वानुमते या नाराध्यमाचे कोणीही वकीलपत्र घ्यायचे नाही, त्याला कुठलीही न्यायालयीन मदत मिळाली नाही पाहिजे तसेच भोरमधूनच नव्हे तर पणे जिल्ह्याचाही तसा ठराव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed