खंडेलवाल शब्द उच्चारता येत नाही त्यांनी खंडेलवाल बद्दल बोलावे काय  सामाजिक कार्यकर्ते की सोशल मीडियाचे कलाकार?

0
IMG-20260505-WA0004.jpg


नांदड (प्रतिनिधी) – नांदेड शहरात सध्या एक वेगळीच नाट्यमय मालिका सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्या आवक खिडकीत तक्रार दिल्याचा मोठा गाजावाजा करत काही स्वयंघोषित वीर इतवारा परिसरातील ठाणे परिसरात उभे राहून व्हिडिओ शूट करताना दिसले. तक्रार दिली की प्रसिद्धी मिळते, असा नवीन नियम कुठल्या कायद्यात आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.व्हिडिओमध्ये स्वतःला समाजाचे तारणहार म्हणवून घेणारे हे महाशय प्रत्यक्षात कोणत्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात, हा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. एका प्रकरणात दलाली, दुसऱ्या प्रकरणात खंडणी, तर तिसऱ्या ठिकाणी ब्लॅकमेलिंगचे आरोप आणि एका प्रकरणात बलात्काराचा आरोप आणि वरून मी सामाजिक कार्यकर्ता अशी घोषणा! सामाजिक कार्यकर्ता होण्यासाठी प्रमाणपत्र लागत नाही, हे खरे; पण किमान समाजासाठी काम केलेले तरी दिसावे, अशी साधी अपेक्षा लोकांची आहे.आणि स्वःता ला पत्रकार म्हणवणारा कोणत्या प्रमाणपत्रानुसार पत्रकार आहे. विशेष म्हणजे, हिंदी-मराठीचे मिश्रण करत भाषण करणाऱ्या या मंडळींना एकही भाषा नीट बोलता येत नाही, अशी चर्चा परिसरात रंगली आहे. पण आत्मविश्वास मात्र इतका प्रचंड की स्वतःच न्यायालय, स्वतःच तपास यंत्रणा आणि स्वतःच मीडिया असल्यासारखे वर्तन.रामप्रसाद खंडेलवाल यांच्या पोर्टलबाबत (वास्तव न्यूज लाईव्ह) हे त्यांचे आहे असे सांगणाऱ्यांनी आधी माहिती तपासावी, ते पोर्टल तुमच्या बापाचे आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कारण ज्यांना सत्य माहित नाही तेच मोठमोठ्या घोषणा देताना दिसतात. कुणाला ब्लॅकमेल केले, कुणाला धमकावले, याची यादी तयार असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला, ते स्वतः तक्रार करतीलच त्यासाठी व्हिडिओ बनवून नाट्य उभे करण्याची गरज काय?दरम्यान, बशीर लाला प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असून न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारच कारवाई सुरू आहे.त्या बशीर लाला ला न्यायालयाने जामीन दिल्याचे वास्तव न्यूज लाईव्हच्या वृत्तात लिहिलेले आहे. हे वाचले नाही काय  उत्कोचभोजी  (संस्कृत अभ्यास कर).  कायदा आपले काम करत असताना सोशल मीडियावर न्यायदान करण्याचा उद्योग नेमका कोणासाठी, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. बलात्काराच्या आरोपात पोलीस कोठडी अनुभवलेल्यांनी नैतिकतेचे धडे देणे हीदेखील नागरिकांसाठी विनोदाचीच बाब ठरत आहे.नांदेडकर जनता मात्र शांतपणे सगळे पाहत आहे. धर्म, समाज आणि न्याय यांच्या नावाखाली प्रसिद्धी मिळवण्याचा उद्योग किती दिवस चालणार, याची उत्सुकता वाढली आहे. कारण शेवटी जनता सर्व पाहते, लक्षात ठेवते आणि योग्य वेळी मतही व्यक्त करते.आता उरलेला प्रश्न एकच  समाजसेवा खरंच होतेय की फक्त कॅमेऱ्यासमोर समाजसेवेचा अभिनय? वेळच याचे उत्तर देईल.राजकीय पक्षाचे नाव घेण्याची हिम्मत बशिर लालाची झाली नाही. रामप्रसाद खंडेलवाल बद्दल अंदाज लावू नका  बशीर लाला आणि शेख याहियाला रामप्रसाद खंडेलवाल तेव्हडाच माहित आहे जेव्हडा त्यांनी दाखवला आहे. उगीचच याजूद – माजुद होण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर त्यांचे याजूद – माजुद सारखेच तुमचे हाल होतील.एके काळी शेख याहिया तर सकाळ दुपार संध्याकाळ दिवसातून तीन वेळेस रामप्रसाद खंडेलवालच्या उंबरवठयावर डोके टेकवत होता. म्हणूनच म्हणतात आंधळ्याला दिसायला लागले की तो सर्वात अगोदर ती काठी फेकतो ज्या काठीने त्याला आंधळे पणात सहारा दिला होता. या अगोदर सुद्धा बशीर लाला ने वकिलांकडून एक तक्रार लिहून घेतली होती. ती तक्रार अनेक पत्रकारांना देऊन त्यांच्या पायावर डोके ठेवले होते. पण कोणीच ती छापली नव्हती हे विसरलात काय सुणियांनो (याचा अर्थ समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वरी चे वाचन करा) रामप्रसाद खंडेलवालने बातमी लिहिली नाही,वास्तव न्यूज लाईव्ह पोर्टल त्यांचे नाही त्यांनी फक्त बातमी फॉरवर्ड केली आहे. असे जगातील कोणीही व्यक्ती करू शकतो सुणियांनो .तरीपण पाहुनच घेवूत  ….


Post Views: 236






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed