काटेपूर्णा प्रकल्पातील साठा 32%, शहरावर पाणीटंचाईचे सावट गडद:तलावातील बाष्पीभवन वाढून जलसंकटात वाढ होण्याची चिन्हे
.

गेल्या आठवडाभरापासून मागील आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तापमानाच्या पाऱ्याने ४५ अंश सेल्सियसची पातळी ओलांडल्याने जिल्ह्यातील जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होऊन जलसाठ्यात आठवडाभरात सुमारे एक ते दीड टक्क्यांनी घट झाली आहे. ३० एप्रिलअखेर जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या आणि अकोला शहराची पाण्याची मदार अवलंबून असलेल्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाची पाणीपातळी ३२ टक्क्यांवर आली आहे. आठवडाभरात या प्रकल्पातील जलपातळी दोन टक्क्याने घटली आहे. तापमानाचा पारा ४३ ते ४६ अंशांदरम्यान राहिला तर याच वेगाने होणारे पाण्याचे बाष्पीभवन पाहता जलसाठ्यातील होणारी संभाव्य घट लक्षात घेता, पुढील दीड ते दोन महिना पाण्याच्या बाबतीत कसोटी पाहणारा असणार आहे. अकोला शहरालाही जून महिन्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढण्यास सुरवात झाली. उर्वरित पान ४
यंदा जगातील सर्वात जास्त तापमान असलेल्या १० शहरात अकोल्याचा समावेश आहे. त्यामुळे महान धरणातील पाण्याचे बाष्पीभवन हे मोठ्या प्रमाणात होत आहे. बाष्पीभवन रोखण्यासाठी धरणाच्या कडेला झाडे लावल्यामुळे वाऱ्याचा वेग कमी होतो. परिणामी बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. तसेच तलावांची खोली वाढवल्याने पृष्ठभागावरून कमी बाष्पीभवन होते. आता आगामी वर्षांसाठी धरणाच्या कडेला मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व धरणाचे खोलीकरण करणे अत्यावश्यक असेल. यंदा पाऊस चांगला झाल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील पाण्याची पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे भरली होती. त्यामुळे धरणांमध्ये तलावांमध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध झाला होता. यंदा काटेपूर्णातून शेतकऱ्यांना पाण्याचे सात आर्वतनेही देण्यात आली. तरी आतापर्यंत जलसाठा समाधानकारक होता. मात्र, गेल्या आठवडाभरापासून उन्हाचा कडाका वाढल्याने त्याचा पाण्याच्या पातळीवर होत आहे. भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने कमी झाली. शहरातील बोअरिंग आटण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे एकुणच पाण्याची मागणी वाढल्याने सध्या पाणीटंचाईचे चित्र निर्माण झाले आहे. उपयुक्त प्रा.डॉ. संजय खडक्कार, माजी सदस्य विदर्भ वैज्ञानिक विकास मंडळ. गतवर्षी यंदा
कूपनिलकाही आटण्याच्या मार्गावर
