मनपाच्या विरोधी पक्ष नेते पदी एमआयएम चे मसूद अहमद खान
नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपदी एमआयएम पक्षाचे नगरसेवक मसूर अहमद खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर कविता मुळे यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी एमआयएमचे प्रमुख नेते सय्यद मोईन, पक्षाचे पदाधिकारी तसेच अनेक नगरसेवक उपस्थित होते. मसूर अहमद खान यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारताना शहराच्या विकासासाठी सकारात्मक आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर भक्कमपणे आवाज उठवण्याची ग्वाही दिली. महानगरपालिकेतील प्रशासन पारदर्शक व जनतेकेंद्रित राहावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या नियुक्तीमुळे महानगरपालिकेच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.


Post Views: 303
