पतंजली परिवारातर्फे महाराष्ट्र, कामगार दिन, बुद्धपौर्णिमा उत्साहात:आरोग्याचा दिला संदेश

0
240_177780817269f7332cee670_03patanjali.jpg



.

महाराष्ट्र दिन कामगार दिन व बुद्धपोर्णिमा हा त्रिवेणी संगम साधत हा दिवस पतंजली योग परिवारातर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शांती आरोग्य व श्रमाचा संदेश देत विशेष योग साधना, ध्यान, प्राणायाम सकाळी ६ ते ६.३० पर्यंत घेण्यात आले.

विशेष अतिथी म्हणून प्रल्हाद सुलताने, नारायणराव अंधारे, नीळकंठ साबळे, पुरुषोत्तम आवळे, चंद्रकांत सोनोणे, कपिल लाड, विनायकराव पांडे, हरीश पारवानी, हरीश माखिजा उपस्थित होते. कल्पना गायकवाड, नलिनी वानखेडे, डॉ. सुनीता कावळे यांनी बुद्धवंदना सादर केली.

सबका मंगल होये रे हे मंगल गीत म्हणण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य गीत, टिळक पार्क योग साधिकांनी सामुहिक म्हणण्यात आले. खिरीचा प्रसाद वितरण करण्यात आला. कार्यक्रमाला नारायणराव अंधारे, डॉ. सुहास काटे, वंदना चिंचोळकर, सुभाष शेकोकार आदी होते. सूत्रसंचालन श्रीकांत चाळीसगावकर यांनी केले.

याप्रसंगी पतंजली जिल्हा प्रमुख हरीश माखिजा, सहप्रभारी हरीश पारवानी, मीना गणगणे, प्रदीप बांधवकर, नीलेश जाजू, अनिल नाईक, संजय पारीख, यदुराज तायडे, किशोर बांधवकर, जी. डी. काकड, सुरेश दरेकर, सुनील राऊत, किरण चौक आदी उपस्थित होते. प्रकाश जसवाणी व दीपक जसवाणी यांनी शरबत वाटप केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed