पश्चिम बंगालचा विजय सरळ मार्गाने नाही मिळवला:संजय राऊत यांची भाजपवर टीका, म्हणाले- दिवा विझताना मोठा होत असतो

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-04t162501750_1777892140.jpg




आज पश्चिमन बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. यात पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय होताना दिसत आहे. तर केरळमध्ये कॉंग्रेसला अधिक मत मिळतंय दिसत आहे. या सगळ्या परिस्थितीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पश्चिम बंगालचा विजय हा सरळ मार्गाने मिळवलेला नसल्याची टीका राऊत यांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले, लुटालूट सुरू आहे. सीआरपीएफची मदत भाजपच्या कार्यकर्त्यांना होईल. हे जरी असले तरी भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्ता घेताना दिसत आहे. मोदी आणि शहा यांचे जे स्वप्न होते की पश्चिम बंगालमध्ये निवडणूक जिंकावी त्यांच्या कार्यकिर्दीत. हे त्यांचे सवपान पूर्ण झाले आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे कदाचित मोदी आणि शहा यांचे राष्ट्रीय स्तरावरचे कार्य संपलेले दिसत आहे. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, द्वेष, धर्मांधता, एसआयआर या सगळ्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांचा विजय रोखणे आणि त्यांचा पराभव करणे हे अशक्य आहे. त्यामुळे आज भारतीय जनता पक्ष जिंकताना दिसत आहे, हा विजय सरळ मार्गाने मिळवलेला नाही, हे आपणही पाहत आहात. केरळमध्ये कॉंग्रेसला प्रचंड यश मिळाले आहे, एक राज्य नव्याने कॉंग्रेसकडे आले आहे. आसाममध्ये भाजप जिंकत आहे, त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तामिळनाडूमध्ये टीवीके नावच्या पक्षाला लोकांनी मतदान केले आहे. ज्यांना राजकारणाचा आणि समाजकारणाचा कोणताही अनुभव नाही. पण डीएमके आणि एडीएमके या दोघांपेक्षा लोकांनी विजय थलापथीच्या पक्षाला मतदान केले आहे. तिथे कोणालाही बहुमत मिळालेले नाही. दिवा विझताना मोठा होतो संजय राऊत म्हणाले, दिवा विझताना मोठा होतो. पश्चिम बंगाल, तिथल्या दिव्याची वात जास्त मोठी होती. एनडीएच्या पतनाची ही सुरुवात आहे असे मी मानतो. जिंकले पश्चिम बंगाल, आसाम तरी त्यांना देश चालवणे सोपे नाही. असे काय महान काम केले आहे एनडीएने मागच्या काही वर्षात, कोणी मला सांगितले तर त्याचा मी सत्कार करेल. प्रचंड महागाई वाढलेली आहे. गॅस सिलिंडर मिळत नाहीये, नोकरी नाही मिळते. जगात भारताची मानहानी सुरू आहे. मणिपूर जळत आहे आणि तरी सुद्धा लोक मतदान करत आहेत, असे चित्र निर्माण केले जात असेल तर हा घोटाळा आहे. भाजप आणि निवडणूक आयोगाची युती भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा कधीच पराभव करू शकत नाही. पण भाजप आणि निवडणूक आयोगाची युती झाली आणि त्या युतीमुळे हा पराभव झाला. आता हे जे निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार, त्यांना आता काय बक्षीस मिळतंय याची आता आम्हाला प्रतीक्षा आहे, असे संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *