Sunetra Pawar Breaks Ajit Pawars 2019 Record in Baramati
![]()
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी विजय झाला आहे. 24 व्या फेरीअंती सुनेत्रा पवार यांचा 2 लाख 18 हजार 930 एवढ्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यांना आव्
.
बारामती विधानसभेसाठी गत 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते. पण 22 अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यामुळे ही निवडणूक झाली. त्यानंतर आज झालेल्या निवडणुकीत सर्वच अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. सुनेत्रा पवार यांचा तब्बल 2 लाख 18 हजार 930 एवढ्या मताधिक्याने ऐतिहासिक विजय झाला. यामुळे देशात सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावाने नोंदवला गेला आहे. त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होणे अजून बाकी आहे.
अजित पवारांचा 2019 चा विक्रम मोडला
सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या 2019 च्या मताधिक्याचा विक्रमही मोडित काढला आहे. मतमोजणीच्या 20 व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना तब्बल 1 लाख 89 हजार मतांची आघाडी मिळवली. त्याद्वारे त्यांनी 2019 च्या निवडणुकीत अजित पवारांना मिळालेल्या 1 लाख 65 हजारांच्या मताधिक्याला मागे टाकले. बारामती मतदारसंघातील निवडणुकांची यापूर्वीची आकडेवारी पाहिली, तर तिथे अनेक वर्षांपासून अजित पवारांचे निर्विवाद वर्चस्व दिसून येते. 2019 च्या निवडणुकीत अजित पवारांनी 70 टक्के मतदानात 1 लाख 95 हजार 641 मते मिळवत 1 लाख 65 हजार 265 मताधिक्याचा विक्रम रचला होता.
तत्पूर्वी, 2014 मध्ये त्यांनी 1 लाख 50 हजार 588 मते मिळवत 89 हजार 791 मतांचे मताधिक्य मिळवले होते. त्याअगोदर 2009 च्या निवडणुकीत अजित पवारांना 68 टक्के मतदान मिळवले होते. त्या निवडणुकीत त्यांनी 1 लाख 28 हजार 544 मते मिळवत 1 लाख 2 हजार 797 मतांची विजयी आघाडी घेतली होती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीतकही अजित पवारांचा 1 लाख 1 हजार मतांच्या मताधिक्याने विक्रमी विजय झाला होता. त्यानंतर यंदाच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांनी ऐतिहासिक आघाडी घेतली. दरम्यान, या निवडणुकीत 2 लाख 23 हजार 705 मतदारांनी आपला मताधिकार बजावला होता.
अपक्ष उमेदवारांचा धुव्वा उडाला
सुनेत्रा पवारांना या निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे व अभिनेते अभिजित बिचकुले यांच्यासह तब्बल 22 अपक्ष उमेदवारांनी आव्हान दिले होते. पण यापैकी कुणालाही हजार किंवा त्याहून अधिक मते घेता आली नाही. 6 अपक्षांना 500 च्या आत मते पडली. तर उर्वरित उमेदवारांना दुहेरी मतांचा आकडाही ओलांडता आला नाही.
देशातील सर्वात मोठे मताधिक्य
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना मिळालेले मताधिक्य हे देशातील सर्वात मोठे मताधिक्य असल्याचा दावा केला जात आहे. यापूर्वी 2022 मध्ये उत्तर प्रदेशातील सुनील कुमार शर्मा हे 2 लाख 14 हजार 835 मतांनी विजयी झाले होते. सुनेत्रा पवारांनी त्यांचा हा विक्रम मोडला आहे.
विजयानंतर जल्लोष करू नका – पार्थ पवार
सुनेत्रा पवारांचे ज्येष्ठ सुपुत्र खासदार पार्थ पवार यांनी या विक्रमी विजयाबद्दल मतदारांचे आभार मानत आपल्या कार्यकर्त्यांना विजयाचा जल्लोष साजरा न करण्याचे आवाहन केले आहे. आज सुनेत्रा पवारांचा विक्रमी मतांनी विजय झाला. त्यांना या निवडणुकीला सामोरे जावे लागेल असे वाटले नव्हते. आज आनंदाचा दिवस आहे असे आम्हाला कुणालाही वाटत नाही. त्यामुळे कुणीही विजयाचा जल्लोष साजरा करू नये. मी इथे कायम लोकांसाठी उपलब्ध असेल. आचारसंहिता संपल्यानंतर मी येथे जनता दरबारही घेईन, असे ते म्हणाले.
