ग्राहकांच्या समाधानासाठी काम करा- मुख्य अभियंता अशोक साळुंके:महावितरणच्या ५० तांत्रिक कर्मचाऱ्यांना ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने केले सन्मानित‎

0
240_177770083869f58fe67e090_1004629430.jpg




प्रतिनिधी । अमरावती महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनांनिमित्त महावितरणच्या अमरावती परिमंडळातील ८ यंत्रचालक आणि ४२ तंत्रज्ञ अश्या ५० कर्मचाऱ्यांना ” गुणवंत कामगार ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्युत भवन येथे झेंडा वंदन झाल्यानंतर मुख्य अभियंता अशोक साळुंके यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कार समारंभादरम्यान बोलताना मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केले कि, आपण सर्वांनी ग्राहकांच्या समाधानासाठी काम करायला पाहीजे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे १ मे रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी अधीक्षक अभियंता प्रविण दरोली, अधीक्षक अभियंता (प्र) प्रफुल्ल लांडे, सहाय्यक महाव्यवस्थापक रूपेश देशमुख, कार्यकारी अभियंते राजेश लांडे, प्रदिप अंधारे, राजेश माहुलकर, प्रणाली विश्लेषक नितिन नांदुरकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, उपविधी अधिकारी प्रशांत लहाने, वरिष्ठ व्यवस्थापक शिरीष शहा यांची यावेळी उपस्थिती होती. या वेळी बोलताना मुख्य अभियंता म्हणाले, की वीज ही अत्यावश्यक सेवा आहे, त्यामुळे ग्राहकाचे समाधानासाठी काम करा, पेरले ते उगवते, या उक्तीप्रमाणे दर्जेदार सेवा दिली तर ग्राहकही आपला निश्चित सन्मान करणार, तक्रार शुन्य कार्यालय हा उद्देश समोर ठेवून सर्वांनी सामुहिक प्रयत्न करावे. यासोबत आपले कार्यालय स्वच्छ ठेवून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची परिमंडळ कार्यालयाने सुरू केलेल्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.या वेळी बोलताना अधीक्षक अभियंता प्रविण दरोली म्हणाले की, खाकी गणवेश ही महावितरणची ओळख असून तो सर्वांनी आवर्जून घालावा, अधीक्षक अभियंता (प्रभारी ,अमरावती) प्रफुल्ल लांडे म्हणाले की, गुणवंत पुरस्कार हा कर्मचाऱ्यांने वर्षभर आणि सात्यतपूर्ण केलेल्या कामाचा सन्मान आहे. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्तावित उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी केले, कार्यक्रमाला एका सुत्रात बांधण्याचे काम व्यवस्थापक वित्त व लेखा विकास बांबल आणि विधी अधिकारी आद्यश्री कांबे यांनी केले,तर आभार प्रणाली विश्लेषक नितीन नांदुरकर यांनी केले. गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांसह महावितरण कंपनीचे अधिकारी. परिमंडळातील ५० पुरस्कृत कर्मचाऱ्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील २७ गुणवंत कामागाराचा समावेश असून, यात ४ यंत्रचालक, २३ तंत्रज्ञ आहेत. यवतमाळचे ४ यंत्रचालक आणि १९ तंत्रज्ञ अशा एकूण २३ गुणवंत कामगाराचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed