गाणगापूर-अक्कलकोट मार्गावर भीषण अपघात:अक्कलकोटकडे येणाऱ्या बसला टिप्परची जोरदार धडक; 3 ठार, अनेक जखमी
![]()
गाणगापूर ते अक्कलकोट मार्गावर भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाणगापूरहून अक्कलकोटकडे येणाऱ्या बसला समोरून येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. हा अपघात रुद्देवाडी बस स्टॉपजवळ झाला असून, धडकेचा जोर इतका प्रचंड होता की बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या अपघातात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत सुमारे 25 ते 30 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातानंतर परिसरात बचावकार्य सुरू करण्यात आले असून स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे वृत्त अपडेट होत आहे.
