मुंबई-सातारा महामार्गावर कारला भीषण आग:स्वामीनारायण मंदिराजवळ दुर्घटना, सर्व प्रवासी सुखरूप; वाहतूक सुरळीत करण्याचे पोलिसांचे प्रयत्न

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-03t203530593_1777820766.jpg




पुण्यातील सातारा-मुंबई महामार्गावर स्वामीनारायण मंदिराजवळ एका चारचाकी वाहनाला (क्रमांक MH 43-CG-4068) भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत संबंधित वाहन पूर्णपणे जळून खाक झाले असले तरी, वाहनातील सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही. दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावर काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. घटनेचे दृश्य पाहा ही बातमी आम्ही अपडेट करत आहोत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed