कौटुंबिक वादातून सासऱ्याने केली सुनेची हत्या:भिंतीवर डोके आपटून संपवले, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील घटना

0
293959b7-b891-4a54-b04e-6197af297a95_1777713454746.jpg




पुणे शहरात कौटुंबिक वादातून एका सासऱ्याने आपल्या सुनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तेजस भानुदास चौधरी (वय ३१) हे त्यांच्या कामासाठी शिवाजीनगर कोर्टात गेले होते. त्यावेळी घरात त्यांची पत्नी स्वाती तेजस चौधरी (वय ३१) आणि वडील भानुदास भास्कर चौधरी हे दोघेच उपस्थित होते. तेजस कामावर गेल्यानंतर काही वेळातच त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या भानुदास भास्कर चौधरी यांनी सून स्वाती चौधरी यांचे डोके रागाच्या भरात भिंतीवर आपटले. या हल्ल्यात स्वाती यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला असून, आरोपी सासऱ्याला ताब्यात घेतले आहे. तेजस चौधरी हे शिवाजीनगर कोर्टात नोकरी करत असतानाच त्यांच्या घरी हा प्रकार घडला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. वादाचे नेमके कारण काय होते आणि यापूर्वी काही तक्रारी होत्या का, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed