अहिल्यानगरमध्ये 65 वर्षांच्या पित्याचा मुलाकडून खून:किरकोळ वादातून केले चाकूने वार, श्रीरामपूरमधील दत्तनगर येथील घटना

0
origdownload1700696661-3_1777694828.jpg




श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरात 1 मे रोजी रात्रीच्या सुमारास माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. किरकोळ कौटुंबिक वादाचे रूपांतर हिंसेत होऊन एका 30 वर्षीय मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यासह दत्तनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1 मेच्या रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास 65 वर्षीय मुसा हसन बागवान आणि त्यांचा मुलगा आशपाक बागवान यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात आशपाकने घरात असलेल्या चाकूने आपल्या वडिलांवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात मुसा हसन बागवान गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी मुलाला घेतले ताब्यात घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. पुराव्यांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी आशपाक बागवान याला बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात हा केवळ कौटुंबिक वादाचा परिणाम असल्याचे दिसत असले, तरी वादाची नेमकी आणि सखोल पार्श्वभूमी काय होती, याचा तपास पोलिस करत आहेत. किरकोळ वादातून पोटचा मुलगा इतका निर्दयी कसा बनू शकतो? असा सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. या घटनेने बागवान कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून दत्तनगर परिसरात भीतीचे वातावरण आहे. अहिल्यानगरात बदलीच्या रागातून कंपनी मॅनेजरवर जीवघेणा हल्ला‎ दुसरीकडे अहिल्यानगरात कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल वरिष्ठांना दिल्याच्या रागातून ‎एमआयडीसी क्षेत्रातील एका कंपनीच्या व्यवस्थापकाला बेदम मारहाण करण्यात‎ आली आहे. याप्रकरणी महेश साहेबराव गायकवाड आणि त्याच्या दोन‎ साथीदारांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मॅनेजर ‎जितेंद्र कुमार सिंग यांनी आरोपी महेश गायकवाड हा पेन्ट शॉपमध्ये झोपलेला ‎असतानाचा अहवाल वरिष्ठांना दिला होता. यावरून महेशची दुसऱ्या विभागात‎ बदली करण्यात आली. याचाच राग मनात धरून महेशने कंपनीसमोर जितेंद्र कुमार ‎यांना गाठले.आरोपींनी त्यांना खाली पाडून हातातील कड्याने आणि लाकडी‎ ठोकळ्याने डोक्यावर प्रहार करत गंभीर जखमी केले. भररस्त्यात झालेल्या या‎मारहाणीनंतर आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देऊन पळ काढला.‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed